Jaya Bachchan Troll: राज्यसभेच्या खासदार, ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा राग सगळ्यानाच परिचित आहे, त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा राज्यसभेत (rajya sabha) आला.
जया बच्चन यांच्या रागाचे अनेक किस्से सांगितले जातात. आपल्या रागामुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. समाज माध्यमावर नेटकरी त्यांच्यावर निशाना साधत आहे. जया बच्चन यांचा राज्यसभेतील त्या व्हिडिओवरुन नेटकऱ्यांमध्ये जुंपली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
जयाजींचा आताच्या रागाचा विषय राज्यसभेतील आहेत, त्या आपल्या खूर्चीकडे बोट दाखवीत सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांच्याशी वाद घालत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यांच्याशी संवाद साधताना सभापती धनखड हे आपल्या जागेवर उभे आहेत, असे या व्हिडिओत दिसते. या वादावर भाजपकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. ते एकमेकांवर तुटून पडत आहेत.
रागात बोट दाखवत असलेल्या जया बच्चन यांचा फोटो व्हायरल होत आहे. त्यावर काही नेटकऱ्यांनी त्याचे पती अभिनेते अमिताभ बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन यांच्यावर मीम्स शेअर केले आहेत. जया बच्चन या समाजवादी पार्टीच्या खासदार आहेत.
@paharibanda07 नावाच्या एका यूजरने म्हटले आहे की, जया बच्चन या जगातील सर्वात रागीट, अहंकारी महिला आहेत. भाजपने अभिनेत्री रेखा यांना राज्यसभेत पाठवले पाहिजे.
@Ayushag94627972 नावाच्या यूजरने म्हटल आहे की संसदेत वाद करताना सीमा-रेषा (सीमा-रेखा) असायची हवी
@lkantbhardwaj यांनी लिहिले आहे की,अहंकारी जया बच्चन उपराष्ट्रपतींना बोट दाखवत आहेत, जया बच्चन यांच्या सारख्या महिला लोकशाहीच्या या मंदिरात कशाला येतात?
काय आहे त्या व्हायरल व्हिडिओमध्ये ?
समाजपादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांचा हा व्हायरल होणारा व्हिडिओ 9 फेब्रुवारी रोजीचा आहे. हा व्हिडिओ राज्यसभेच्या कामकाजाचा आहे. अदानी घोटाळ्यावरून संसदेत गदारोळ सुरू असताना, सभापतींच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार रजनी पाटील यांना चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजासाठी निलंबित करण्यात आले. जया बच्चन काँग्रेस खासदाराच्या समर्थनार्थ बोलल्या. रजनी पाटील यांना स्पष्टीकरण देण्याची संधीही दिली नसल्याचा आरोप करत त्यांनी थेट सभापतींकडे बोट दाखवले. त्यांचा हाच व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.