PM Narendra Modi, Prahlad Patel Sarkarnama
देश

BJP Minister : लोकांना सरकारकडे भीक मागण्याची सवय लागलीय! भाजपच्या मंत्र्यांचे बेताल वक्तव्य

Prahlad Patel Controversial Statement Political News Madhya Pradesh : भाजपचे मंत्री प्रल्हाद पटेल यांनी शनिवारी राजगढ येथे एका कार्यक्रमात बोलताना वाद ओढवून घेतला आहे.

Rajanand More

Political News : देशात बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांमध्ये दिवसेंदिवस भरच पडत चालली आहे. भाजपच्या एका मंत्र्यांनी तर थेट जनताच भिकारी असल्याचे विधान केले आहे. त्यामुळे देशभरात या विधानाविरोधात मोठी संताप निर्माण झाला आहे. मध्य प्रदेशचे पंचायत व ग्रामीण विकास मंत्री प्रल्हाद पटेल यांनी हे वादग्रस्त विधान केले असून त्यावरून राजकारण तापले आहे.

भाजपचे मंत्री पटेल यांनी शनिवारी राजगढ येथे एका कार्यक्रमात बोलताना वाद ओढवून घेतला आहे. या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भाषणात बोलताना ते म्हणाले, आता तर सरकारकडे भीक मागायची सवय लोकांना लागली आहे. नेते येतात, त्यांच्याकडे पिशवीभर मागणीपत्र सोपवली जातात. ही चांगली सवय नाही, असे पटेल म्हणाले आहेत.

पटेल एवढ्यावर थांबले नाहीत. पुढे बोलताना ते म्हणाले, घेण्याऐवजी देणारे बनण्याचे मन बनवा. मी खात्रीने सांगतो की, तुम्ही सुखा व्हाल आणि संस्कारवान समाज उभा कराल. भिकाऱ्यांना प्रोत्साहित करणे, म्हणजे समाज मजबूत करणे नव्हे तर त्यांना दुबळे बनविण्यासारखे आहे, असे सांगत पटेलांनी थेट जनतेला भिकारी असे संबोधले.

मोफतच्या गोष्टींविषयी आकर्षण हा सन्मान नाही. समाजाला मजबूत करण्यासाठी लोकांना आता आत्मनिर्भर व्हायला हवे, असा सल्लाही पटेलांनी दिला. त्यावरून प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने भाजप सरकारला घेरले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनी पटेल यांनी राज्यातील जनतेचा अपमान केल्याचे म्हटले आहे.

जनतेला भिकारी म्हणण्यापर्यंत भाजपचा अहंकार वाढला आहे. अडचणीत असलेल्या लोकांच्या अपेक्षांचा आणि अश्रूंचा हा अपमान आहे. निवडणुकीआधी ते खोटी आश्वासने देतात आणि नंतर ती पूर्ण करण्यासाठी नकार देत आहे. जनतेने आठवण करून दिल्यानंतर त्यांनाच भिकारी म्हणतात. जनतेने लक्षात ठेवावे, हे लवकरच तुमच्याकडे मते मागण्यासाठी येणार आहेत.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT