BJP Ministers Pratima Bagri News Sarkarnama
देश

BJP Ministers: भाजप राज्यमंत्र्यांचा सख्खा भाऊ अटकेत; 46 किलो गांजा जप्त

BJP Ministers Relative Arrested: अनिल बागरी आणि पंकज सिंह यांना अटक केली आहे. एकूण 46 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. त्यांची किंमत सुमारे नऊ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Mangesh Mahale

BJP Ministers Pratima Bagri News: सतना जिल्ह्यातील रामपूर बघेलान पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी अवैधा गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तींविरोधात मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. एका राज्यमंत्र्यांचा भाऊ यात सहभागी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

घटनास्थळी पोलिसांनी अनिल बागरी आणि पंकज सिंह यांना अटक केली आहे. या दोघांचा साथीदार तिसरा आरोपी शैलेंद्र सिंह उर्फ सोम राजावत हा यापूर्वी अवैध गांजा विक्री प्रकरणी जेलमध्ये आहे. एकूण 46 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. त्यांची किंमत सुमारे नऊ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील मुख्य आरोपी अनिल बागरी हा विद्यमान राज्यमंत्री प्रतिमा बागरी या सख्खा भाऊ आहे.

पोलिसांनी आपल्या खबऱ्याकडून या अवैध गांजा विषयी माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी परिसरात नाकेबंदी करुन सापळा रचून छापा टाकला. पोलिसांना एका पत्र्याच्या खोलीत चार पोती गांजा आढळला. या गांजाच्या पँकिंगवरुन आरोपींचे रॅकेट मोठे असल्याचा पोलिसांना संशय आहे. या छाप्यात पंकज सिंह आणि अनिल बागरी यांनी पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिस तपासात दोन्ही आरोपीकडून शैलेंद्र सिंह उर्फ सोम राजावत यांचे नाव समोर आले आहे, शैलेंद्र हा सध्या जेलमध्ये आहे. जप्त करण्यात आलेले गांजाच्या पॅकेटवरुन आरोपी हा माल जिल्ह्यातील अन्य ठिकाणी विक्रीसाठी पाठत असतील, असे दिसते. पॅंकिंगवरुन हे नियोजनबद्ध अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे जाळे असल्याचे प्राथमिक तपासात आढळले, असे सतानाचे पोलिस अधिक्षक प्रेमलाल कुर्वे यांनी सांगितले.

पंकज सिंह आणि अनिल बागडी आणि शैलेंद्र यांच्याकडून आपल्याला हा माल मिळाल्याची कबुली पंकज सिंह यांनी दिली. आरोपींनी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायाधीशांनी आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या सर्व व्यवसायाचा मास्टरमाईंड कोण आहे, याचा तपास सध्या पोलिस करीत आहेत. राज्यमंत्र्यांच्या सहभाग आहे का? या बाजूनेही पोलिस तपास करीत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT