Parliament Security Breached Sarkarnama
देश

Parliament Security Breach : सरकारला संसदच सुरक्षित ठेवता येत नसेल तर देशाचं काय?

Parliament Winter Session 2023 : खासदारांसह आमदारांनी दिली तिखट प्रतिक्रिया

सरकारनामा ब्यूरो

Parliament Security Breach : घुसखोरांनी बुटातून आणले स्मोक कँडल! पीठासीन अध्यक्षांनीच सांगितली आपबीतीParliament Winter Sessions :  :  लोकसभेच्या प्रेक्षक गॅलेरीतून घुसखोरांनी उडी मारून स्मोक स्कँडल फोडले. त्यामुळे खासदारांमध्ये एकच घबराट निर्माण झाली. या घुसखोरीने संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. या घटनेवरून आमदार रोहित पवार यांनी सरकारला संसदच सुरक्षित ठेवता येत नसेल तर देशाचं काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

रोहित पवार यांनी ट्विटरद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. संसदेवरील हल्ल्याला आजच २२ वर्षे पूर्ण होत असताना तीन अज्ञातांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारुन लोकसभेत केलेला गोंधळ ही गोष्ट अत्यंत धक्कादायक आणि सुरक्षेततेतील अक्षम्य त्रुटी आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.खासदारांनी देखील घुसखोरीवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. संसदेमध्ये येणारे समान्य लोक तसेच पत्रकार हे टॅग लावत नाहीत.सरकारने काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. आज संसदेमध्ये काहीही घडू शकल असते, असे खासदार डिंपल यादव म्हणाल्या.

घुसखोरांनी फोडलेल्या स्मोक स्कँडलमध्ये विषारी धूर असता तर काय झाले असते. आजच्याच दिवशी संसदेवर हल्ला झाला होता. अशा प्रकारे घुसखोरी होणे हे खुपच गंभीर आहे, असे काँग्रेस खासदार किर्ती चिंदबरम म्हणाले.

घुसखोरी करणाऱ्या तरुणांमध्ये महाराष्ट्रातील लातूर येथील तरुण अमोल शिंदे याचा समावेश होता. त्याच्यासोबत नीलम कौर नावाची महिला आणि सागर शर्मा नावाचा तरुण होता. नीलम कौर ही हरियाणातील हिसार येथील असल्याचे समजते आहे. तानाशाही नही चलेगी असा घोषणा देखील घुसखोरांनी दिल्या होत्या. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांनी पोलिस महासंचालकांना फोन करून घुसखोर करणाऱ्या अमोल शिंदेची माहिती घेण्याच्या सुचना दिल्या.

(Edited by Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT