Parliament Security Breach : घुसखोरांनी बुटातून आणले स्मोक कँडल! पीठासीन अध्यक्षांनीच सांगितली आपबीती

Lok Sabha Protest : लोकसभेच्या सभागृहात घुसखोरी झाली त्यावेळी भाजपचे खासदार राजेंद्र अग्रवाल हे पीठासीन अध्यक्ष होते.
BJP MP Rajendra Agrawal
BJP MP Rajendra AgrawalSarkarnama
Published on
Updated on

Parliament Winter Session 2023 : लोकसभेमध्ये दोन तरुणांनी घुसखोरी केल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सर्वसामान्य नागरिकांना लोकसभेत जायचे असल्यास मोठ्या सुरक्षा यंत्रणेतून जावे लागते. पण असे असूनही एका तरुणाने बुटातून स्मोक कँडल नेल्याचे आता समोर आले आहे. पीठासीन अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनीही याला दुजोरा दिला आहे. तसेच सुरक्षा यंत्रणेत काहीतरी चूक झाल्याची कबुलीही त्यांनी दिली.

लोकसभेच्या (Lok Sabha) सभागृहात घुसखोरी झाली त्यावेळी भाजपचे (BJP) खासदार राजेंद्र अग्रवाल हे पीठासीन अध्यक्ष होते. त्यांच्या डाव्या बाजूकडील प्रेक्षागृहातून तरुणांनी उड्या मारल्या. त्यानंतर एकच गदारोळ झाला. याविषयी ‘एएनआय’शी या वृत्तसंस्थेशी बोलताना अग्रवाल यांनी सुरक्षाव्यवस्थेत चूक झाल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. (Security breach in Lok Sabha)

BJP MP Rajendra Agrawal
Lok Sabha Security Breach : क्या हुआ, गिर गया... पकडो पकडो पकडो! लोकसभेत घुसखोरी झाली अन्...

घटनेविषयी बोलताना अग्रवाल म्हणाले, प्रेक्षागृहातून एक व्यक्त खाली आल्यानंतर आम्हाला वाटले, कुणीतरी खाली पडले. पण जेव्हा दुसराही व्यक्ती खाली येताना दिसला त्यावेळी आम्ही सर्वजण सतर्क झालो.

एका व्यक्तीने आपल्या बुटातून काहीतरी काढले आणि धूर निघाला. याप्रकरणात संबंधितांवर कारवाई केली जाईल. लोकसभा अध्यक्ष आणि सुरक्षेशी संबंधित यंत्रणा याबाबत निर्णय घेतली. ही घटना घडल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंहही लोकसभेत तातडीने आल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली.

दरम्यान, या घटनेनंतर तासाभरातच पुन्हा लोकसभेचे कामकाज नियमितपणे सुरू झाले आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाजाची सुरूवात केली. यावेळी विरोधी पक्षातील नेत्यांनी सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित केले.

त्यानंतर बिर्ला यांनी सर्व सदस्यांना सुरक्षेविषयी आश्वासित करत या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल, असे सांगितले. तसेच घाबरण्याचे काही कारण नसल्याचे त्यांनी सदस्यांना सांगितले.

(Edited By - Rajanand More)

BJP MP Rajendra Agrawal
Parliament Security Breach : लोकसभा घुसखोरी प्रकरणात लातूर कनेक्शन; अमोल शिंदेंसह तीन जण ताब्यात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com