Raghav Chadha Sarkarnama
देश

MP Raghav Chadha : काही दिवसांपूर्वीच निलंबन मागे, आता राघव चढ्ढा यांच्यावर राज्यसभेत मोठी जबाबदारी

Rajanand More

AAP News : आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांच्यावर राज्यसभेत मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. खासदार संजय सिंग हे सध्या तुरुंगात असल्याने त्यांच्याकडील पक्षाचे नेतेपद काढून घेण्यात आले आहे. आता राघव चढ्ढा हे आपचे राज्यसभेतील पक्षनेते असतील. दरम्यान, चढ्ढा यांचे काही दिवसांपूर्वीच निलंबन करण्यात आले होते.

आपकडून (AAP) राज्यसभा (Rajya Sabha) सभापतींना पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘संजय सिंग (Sanjay Singh) यांच्या अनुपस्थितीत राघव चढ्ढा (Raghav Chadha) हे पक्षाचे राज्यसभेतील नेते असतील.’ दिल्ली लिकर पॉलिसी केसमध्ये संजय सिंग हे सध्या तुरुंगात असल्याने पक्षाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

चढ्ढा हे राज्यसभेतील तरुण सदस्य आहेत. सध्या आपचे राज्यसभेत दहा खासदार आहेत. भाजपनंतर राज्यसभेत सर्वाधिक खासदार काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचे आहेत. तर आपचे चौथ्या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे. संजय सिंग हे आपचे आघाडीचे नेते म्हणून ओळखले जातात. राज्यसभेत अधिवेशनादरम्यान ते सरकारवर सातत्याने टीकास्त्र सोडायचे. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, शुक्रवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राघव चढ्ढा यांना सभापती जगदीप धनखड यांनी चांगलेच फटकारले होते. कामकाजादरम्यान चढ्ढा हे हातवारे करत बोलत असताना सभापतींना त्यांना रोखले. हाताने इशारे करू नका. व्यक्त होण्यासाठी तोंडाचा वापर करा. शिक्षा झाल्यानंतरही आनंदी असलेले तुम्ही सभागृहातील एकमेव व्यक्ती आहात. तुमचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. तुम्ही शिक्षा भोगलेली आहे, असे धनखड म्हणाले.  

काही खासदारांची परवानगी न घेता त्यांची नावे प्रस्तावित निवड समितीत समाविष्ट केल्याबद्दलही विशेषाधिकार समितीने चढ्ढा यांना दोषी ठरवले होते. त्यानंतर मागील पाच डिसेंबर रोजी त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले होते. एवढी शिक्षा पुरेशी असल्याचे सांगत सभागृहात आवाजी मतदानाने त्यांचे निलंबन मागे घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT