Amit Shah, Sanjay Raut, Narendra Modi sarkarnama
देश

Sanjay Raut: 'एक अकेला सब पे भारी'; राहुल गांधींमुळे सत्ताधारी गुडघ्यावर; राऊतांचे टीकास्त्र

Rahul Gandhi Lok Sabha speech: फडणवीसांनी सर्व दलाल, एजंट पाळले आहेत. फडणवीस यांनी सगळे दलाल गोळा केले आहेत. फडणवीसांना सत्ता हाती घेतल्यापासून राज्यात असे सुरू आहे.

Mangesh Mahale

विरोधी पक्ष नेता कसा असतो हे काल संसदेत दिसले. राहुल गांधींनी भाजपचा नकली हिदुत्वांचा चेहरा समोर आणला. भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे, हे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी मोदी सरकारला गुडघ्यावर आणले. ते (Rahul Gandhi) मोदींना भारी पडले, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी राहुल गांधींचे कौतुक केले.

राहुल गांधी यांचे कालचे संसदेतील भाषण मार्गदर्शक होते, असे राऊत म्हणाले.राहुल गांधींनी राममंदिर, हिंदूत्व अन् काश्मिर-मणिपूरवरुन मोदी सरकारला धारेवर धरले.

राहुल यांनी हिंदुंचा अपमान केल्याचा आरोपही पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) लगावला. भाजपच्या या आरोपावरुन संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

"देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा एकही आमदार मुळचा भाजपचा नाही. फडणवीसांनी सर्व दलाल, एजंट पाळले आहेत. फडणवीस यांनी सगळे दलाल गोळा केले आहेत. फडणवीसांना सत्ता हाती घेतल्यापासून राज्यात असे सुरू आहे. त्यांच्या टोळ्यांना त्यांच्या भाषेत उत्तर द्यावं लागेल," असा इशारा राऊतांनी दिला.

राऊत म्हणाले, "शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे उत्तर देतात तेच राहुल गांधी यांनी संसदेत दिलं. राहुल गांधी यांनी काल सांगितले भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, तुम्ही हिंदुत्वाचा ठेका घेतला नाही. मजबूत आणि प्रामणिक विरोधी पक्ष काय असतो हे देशाला दिसलं,"

"एक अकेला सब पे भारी' असं संसदेतील कालचे चित्र होते. राहुल गांधी बोलत असताना 9 मंत्री उभे राहिले. त्यांना वारंवार उभे राहावे लागले. 10 वर्षात प्रथम गृहमंत्री अमित शहा यांना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लांकडे संरक्षण मागावे लागले. कालपर्यंत आम्हाला संरक्षण मागावं लागत होतं, काल त्यांना संरक्षण मागावं लागलं. राहुल गांधी यांनी त्यांना गुडघ्यावर आणलं," असा टोला राऊतांनी लगावला.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संसदेत केलेल्या विधानाचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनात उमटले.विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे चांगलेच आक्रमक झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT