Sanjay Raut On Eknath Shinde - Raj Thackeray
Sanjay Raut On Eknath Shinde - Raj Thackeray Sarkarnama
देश

Sanjay Raut News: 'सदू आणि मधु भेटले'; मुख्यमंत्री-राज ठाकरेंच्या भेटीवर राऊतांचा टोला

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (रविवार) पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसातील राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची ही शिवतीर्थावरील तिसरी भेट होती. या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राज यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राज यांची पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते उपस्थित होते. राज ठाकरे-मुख्यमंत्री भेटीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी खोचक शब्दात टीका केली आहे. राऊत माध्यमांशी बोलत आहे.

राज ठाकरे-मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीचे वर्णन 'सदू आणि मधु भेटले, बालभारतीत आम्हाला धडा होता,'अशा शब्दात राऊतांनी खिल्ली उडवली आहे. "उद्धव ठाकरे यांच्या मालेगाव येथील सभेनंतर त्या दोघांच्या भावना उंचबळून आल्या असतील, ते एकमेकांचे डोळे पुसायला गेले असतील, मुख्यमंत्र्यांना सध्या काहीच काम नाही, असा टोला राऊतांनी लगावला.

"देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे कधीच एकत्र येणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे.पी. नड्डा मला संसदेत रोज भेटतात.सत्ताधारी आणि विरोधकांचा येण्या जाण्याचा एकच रस्ता असतो. तेथे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. याचा अर्थ ते एकत्र येणार असा होत नाही. ते अजिबात एकत्र येणार नाहीत. जर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचा वेगवेगळा रस्ता ते बनवणार असतील ते मला माहीत नाही, असे राऊतांनी ठाकरे-फडणवीस यांच्या भेटीविषयी सांगितले.

सावरकरांच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना दिलेला इशारा म्हणजे मॅच फ्किसिंग आहे, अशी टीका काही पक्ष करत आहे, या प्रश्नावर खासदार राऊत यांनी हा पलटवार केला.

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत महिममध्ये समुद्रात तयार झालेल्या अनधिकृत बांधकामाचा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिला होता. यावेळी त्यांनी सरकारने हे अनधिकृत बांधकाम त्वरित हटवावे असेही सांगितले होते. त्यांनी ही मागणी केल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत सरकारने मुंबई महानगरपालिकेला तसे निर्देश देऊन हे अनधिकृत बांधकाम हटवले होते. त्यानंतर या दोघांमध्ये ही सदिच्छा भेट होत असल्याने या भेटीला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT