Uddhav Thackeray News: आपण एकत्र आलो , त्याला फाटे फुटू देऊ नका; राहुल गांधींना ठाकरे गटाचा पुन्हा इशारा

Uddhav Thackeray On Rahul Gandhi : प्रखर योद्धे राहुल गांधी यांना स्वतःच्याच पक्षात आधी उभे करावे लागतील, असे अग्रलेखात म्हटलं आहे.
Uddhav Thackeray , Rahul Gandhi
Uddhav Thackeray , Rahul Gandhi Sarkarnama
Published on
Updated on

Savarkar Controversy : ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (रविवारी) मालेगावच्या सभेत कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांना वीर सावरकरांवरुन चांगलेच सुनावले.

राहुल गांधी वीर सावरकरांविषयी जी मानहानीकारक वक्तव्ये करीत आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी निर्माण झालेल्या सहानुभूतीस ओहोटी लागेल, असे ठाकरे म्हणाले. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असे जाहीर आवाहन त्यांनी सभेत केले. त्यानंतर आज ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातही यावर भाष्य करण्यात आले आहे.

Uddhav Thackeray , Rahul Gandhi
Government On Intercaste Marriage : 'सैराट' चा शेवट टाळण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय ; आंतरजातीय विवाह करणाऱ्या ...

वीर सावरकरांनी इंग्रजांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी इंग्लंड व आपल्या देशातही योद्धे निर्माण केले, त्या योद्धय़ांनी जुलमी राज्यकर्त्यांवर ‘धाडधाड’ गोळय़ा चालवल्या व त्या कृत्याबद्दल सावरकरांनी कधीच खेद व्यक्त केला नाही. सावरकरांनी ज्याप्रमाणे इंग्रजांविरुद्ध अनेक योद्धे उभे केले तसे प्रखर योद्धे राहुल गांधी यांना स्वतःच्याच पक्षात आधी उभे करावे लागतील, असे अग्रलेखात म्हटलं आहे.

"राहुल गांधी वारंवार बोलत आहेत की, मी घाबरत नाही. मला तुरुंगात डांबले तरी प्रश्न विचारत राहीन. राहुल गांधी हे घाबरत नाहीत व अदानी-मोदी संबंधांवर वारंवार प्रश्न विचारीत आहेत हे खरेच, पण राहुल गांधी यांनी स्वतःबरोबरच त्यांच्या संपूर्ण पक्षाला व देशालाही निर्भय बनविण्याची गरज आहे. ‘‘माझे आडनाव सावरकर नाही’’, अशी विधाने वारंवार करून ही निर्भयता निर्माण होणार नाही व वीर सावरकर यांच्या बाबतीत जनतेच्या मनात असलेल्या श्रद्धेलाही तडा जाणार नाही," अशा इशारा दिला आहे.

Uddhav Thackeray , Rahul Gandhi
Bansuri Swaraj News: माजी केंद्रीय मंत्री, दिवंगत नेत्याच्या मुलीवर भाजपने सोपवली मोठी जबाबदारी

"आपण एकत्र आलो आहोत, त्याला फाटे फुटू देऊ नका. आता वेळ चुकली तर देश हुकूमशाहीकडे जाईल," असा इशारा ठाकरे यांनी कालच्या सभेत राहुल गांधींना दिला होता. "वीर सावरकर हे त्यांच्या जागी थोर आहेत. सावरकरांना अकारण ‘माफीवीर’ वगैरे दूषणे लावून लढण्याचे बळ कुणाला मिळणार नाही. ‘वीर सावरकर’ या नावात तेज आहे. अन्याय व गुलामीविरुद्ध लढण्याचे बळ आहे, असे ठाकरे गटाने अग्रलेखात सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com