Mughal Garden :
Mughal Garden :  Sarkarnama
देश

Mughal Garden : मुघलांचं नाव बदलल्याने काँग्रेस आक्रमक : "मुघल गार्डन भाजपने बनवले होते का?"

सरकारनामा ब्यूरो

Mughal Garden : राष्ट्रपती भवनातील प्रसिद्ध मुघल उद्यान आता 'अमृत उद्यान' म्हणून ओळखले जाणार आहे. मात्र आता मुघल गार्डनच्या नामांतरावरून काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने मुघल गार्डनचे नाव का बदलले? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रशीद अल्वी (Rashid Alva) यांनी केला आहे. मुघल गार्डन भाजपने बनवले होते का? राष्ट्रपती भवनही इंग्रजांनी बांधले होते, मग ते पाडाल का? असा सवाल त्यांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना रशीद अल्वी म्हणाले, तुम्ही लाल किल्ला आणि ताजमहालची नावेही बदलणार का? ही भाजप सरकारची सवय झाली आहे. हा संकुचित विचार आहे. ते नेहमी रस्त्यांची, शहरांची नावे बदलतात आणि नावे बदलण्यालाच विकास समजतात. भाजप काय करत आहे? तुम्ही नाव बदलावे हे मला मान्य नाही. पंतप्रधान राहतात ते घरही ब्रिटिशांनी बांधले होते. त्यालाही वगळले जाईल का? भाजपने स्वतःची उद्यान बनवावे आणि हवे ते नाव द्यावे. मी नाव बदलाचा निषेध करतो.”

राजपथचे नावही बदलण्यात आले आहे :

"भारताच्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान राष्ट्रपती भवन उद्यानाला 'अमृत उद्यान' असे सामान्य नाव प्रदान करण्यात आनंद होत आहे," असे राष्ट्रपतींच्या उप-प्रेस सचिव नाविका गुप्ता यांनी एका निवेदनात म्हटले आहे. दिल्लीच्या राजपथाचे नामकरण 'कर्तव्य पथ' असे करण्यात आले. या गोष्टींची नावे बदलणे हा वसाहतवादी मानसिकतेच्या खुणा काढून टाकण्याचा प्रयत्न असल्याचे केंद्राचे म्हणणे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT