ED Office Fire Sarkarnama
देश

ED office fire : भुजबळ, देशमुख की नीरव, ED कार्यालयाच्या आगीत कुणाची फाईल खाक? पहिल्यांदाच आले स्पष्टीकरण

Key Case Files Allegedly Damaged in the Fire : ईडीचे दक्षिण मुंबईतील बेलार्ड इस्टेट परिसरात कैसर ए हिंद इमारतीमध्ये विभागीय कार्यालय आहे. या कार्यालयाला रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती.

Rajanand More

Maharashtra Fire Incidences : सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबईतील कार्यालयाला लागलेल्या आगीवरून आता राजकारण तापू लागले आहे. या आगीत अनेक महत्वाच्या प्रकरणांची कागदपत्रे जळाल्याची चर्चा होत आहेत. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी या आगीवरून ईडीसह सरकारवर निशाणा साधत आगीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ईडीनेच ही आग लावल्याचा आरोपही होत आहे. त्यातच आता ईडीने या आगीबाबत पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले आहे.

ईडीचे दक्षिण मुंबईतील बेलार्ड इस्टेट परिसरात कैसर ए हिंद इमारतीमध्ये विभागीय कार्यालय आहे. या कार्यालयाला रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती. ही आग तब्बल 10 तास धुमसत होती. आगीमध्ये कार्यालयातील अनेक साहित्य व तसेच महत्वाच्या प्रकरणांची कागदपत्रे, फायली जळून खाक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

प्राथमिक तपासामध्ये इमारतीच्या चौथ्या मजल्यावर शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. ईडीनेही आगीचे हेच कारण सांगितले आहे. ईडीच्या विभागीय कार्यालयाकडून महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांची चौकशी केली जात आहे. अनेक महत्वाच्या प्रकरणांचा तपासही ईडीकडे आहे. या प्रकरणांशी संबंधित महत्वाची कागदपत्रे, पुरावे, फायली, सीडी, पेनड्राईव्ह यांसह महत्वाची माहिती याच कार्यालयात आहे. आगीमुळे यापैकी किती साहित्य जळाले याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

ईडीने पहिल्यांदाच या आगीवर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, रविवारी पहाटे 2.25 वाजताच्या सुमारास ईडीच्या मुंबई झोनल ऑफिस-1 च्या मेझानाइन मजल्यावर आग लागली. तळमजल्यावरील मुख्य प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या रात्रीच्या ड्युटीवरील राज्य पोलिस कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात दिली. त्यानंतर, पहाटे 2.30 वाजता अग्निशमन दलाला कळवण्यात आले.

आगीचे प्रथमदर्शनी कारण चौथ्या मजल्यावरील पॉवर बॉक्समध्ये विद्युत शॉर्ट सर्किट असल्याचे दिसून येते. तपासासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही महत्वाच्या कागदपत्रांचे कोणतेही नुकसान झालेले नसावे, असे ईडीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, ईडीने तब्बल दहा तास धुमसणाऱ्या आगीत नेमके काय जळाले, याची स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईडीच्या कार्यालयातील प्रत्येक कागद सुरक्षित असल्याची माहिती मीडियाशी बोलताना दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT