
Telangana Government : मागील काही दिवसांपासून जगभरात घिबली इमेटचं पेव फुटलं आहे. त्यातून ना राजकारणी सुटले, ना IAS-IPS अधिकारी. बहुतेकांच्या सोशल मीडियावर घिबली इमेजचा भडिमार सुरू होता. अशातच एका घिबली इमेजनं मात्र संपूर्ण राज्य सरकार आणि प्रशासनाला हादरवलं. याचं कारण होतं, ही इमेज एका वरिष्ठ महिला IAS ने पोस्ट केली होती. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले आणि आता त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
तेलंगणा राज्य सरकारने जवळपास 20 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली केली आहे. त्यामध्ये स्मिता सभरवाल यांचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी हैदराबादमधील कांचा गचिबोवली जंगलतोडीवरून सुरू असलेल्या वादावर एक घिबली इमेज सोशल मीडियात पोस्ट केली होती. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.
सभरवाल या युवा, पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या विशेष मुख्य सचिव होत्या. आता त्यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. सभरवाल यांनी रिपोस्ट केलेली इमेज सरकारविरोधातील भूमिका मांडणारी होती. त्यावरून हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यामुळे त्यांना पोलिसांसमोर आपले म्हणणे मांडावे लागले.
सभरवाल एवढ्यावरच थांबल्या नाही. चौकशीनंतर त्यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियात एक पोस्ट करून पोलिसांनाच प्रश्न केला होता. ‘ती पोस्ट 2 हजार जणांनी रिशेअर केली होती. त्या प्रत्येकावर अशीच कारवाई होणार का, याचा खुलासा मला हवा आहे. नसेल, तर मग सिलेक्टिव्हि टार्गेटिंगची चिंता वाटते. हे कायद्यासमोर नैसर्गिक न्याय आणि समाननतेच्या तत्वांशी तडतोड केल्यासारखे आहे,’ अशी परखड भूमिका त्यांनी मांडली होती.
सरकारने सभरवाल यांच्या 20 अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश रविवारी काढले आहे. सभरवाल यांची बदली आता तेलंगणा अर्थ आयोगाच्या सदस्य सचिवपदी करण्यात आली आहे. याआधीची त्या याच पदावर होत्या. सभरवाल यांच्या बदलीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याचे कारण म्हणजे, राज्यात बीआरएसची सत्ता असताना त्या तत्कालीन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सचिव होत्या. पण काँग्रेसची सत्ता आल्यानंतर त्यांची मुख्यमंत्री कार्यालयातून बदली करण्यात आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.