Nafe Singh Rathi Murder : Hariyana Political News : Haryana News  Sarkarnama
देश

Nafe Singh Rathi Murder : हरयाणामध्ये INLD च्या प्रदेशाध्यक्षांची भरदिवसा निर्घृण हत्या; हल्लेखोरांचा बेछूट गोळीबार

Anand Surwase

Haryana News : देशातील राजकारणात रक्तरंजित घडामोडीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. आज (दि. 25 फेब्रुवारी) रविवारी हरियाणातील इंडियन नॅशनल लोक दल (INLD)चे प्रदेशाध्यक्ष आणि बहादुरगडचे माजी आमदार नफे सिंग राठी यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत राठी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य चार जण जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

इंडियन नॅशनल जनता दलाच्या प्रवक्ते अमनदीप यांनी दिलेल्या माहितीनुसार नफे सिंह राठी यांना गेल्या काही दिवासांपासून वारंवार जिवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्यावर त्यांनी हरियाणा सरकारकडे राठी यांच्यासाठी सुरक्षा देण्याची मागणी केली होती. परंतु, ती मिळाली नाही. दरम्यान, रविवारी राठी यांच्यावर अज्ञातांकडून बेछुट गोळीबार करण्यात आला. हल्ल्या झाला त्यावेळी राठी हे आपल्या वाहनातून जात होते. त्याचवेळी आय टेन या कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी राठी यांच्या वाहनावर गोळीबार केला. यामध्ये राठी हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राठी हे दोन टर्म विधानसभेचे सदस्य राहिले आहेत. तसेच ते बहादुरगढ़ नगरपरिषदेचे नगराध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. या हल्ल्यात राठी यांच्या एका साथीदाराचाही मृत्यू झाला आहे. त्यांचे वाहन बाराही गेटमधून जात असताना हा हल्ला झाला. या घटनेत राठी यांच्यासह चार जण जखमी झाले होते. त्यातील इतर तीन जण राठी यांचे सुरक्षा कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस (Police) घटनास्थळावर दाखल झाले. त्यावेळी झज्जरचे पोलीस अधीक्षक अर्पित जैन यांनी या गोळीबार प्रकरणातील आरोपींचा अद्याप शोध लागला नसल्याची प्रतिक्रिया दिली. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार हे हल्लेखोर आय-टेन या कारमधून आले होते. त्यांनी राठी यांच्या फॉर्च्युनर कारच्या चारही बाजूंनी गोळ्या झाडून कारची चाळण केली होती.

महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसात ठाणे येथे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये एकावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर मुंबईतील दहिसर भागात शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यामुळे राजकारणात रक्तरंजित घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT