Nanded Bjp News : नांदेडची भाजप काँग्रेसयुक्त; इतर पक्षातून आलेल्यांकडे पक्षाची धुरा

Bjp Politics in Nanded District : अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाने नांदेडमधील भाजपचे राजकारण काँग्रेसयुक्त?
Ashok Chavan Nanded Rally
Ashok Chavan Nanded Rallysarkarnama
Published on
Updated on

Bjp Nanded Politics News :

पार्टी विथ डिफ्रन्स असे म्हणणाऱ्या भाजपचे नांदेडचे चित्र काही वेगळेच पाहायला मिळत आहे. काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेल्या भाजपचे नांदेडमध्ये मात्र काँग्रेससयुक्त भाजप झाले आहे. भाजपत सध्या काँग्रेसससह इतर पक्षातून आलेल्या आजी, माजी, खासदार, आमदारांच्या भरणा झाला आहे. संघाच्या मुशीत तयार झालेले व काही जुने बोटावर मोजण्या इतके ज्येष्ठ नेते भाजपत राहिले आहेत. या पक्षात जुन्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शोधून काढावे लागत आहे.

भाजपने राज्य व देशपातळीवर पक्षाच्या विस्तारासाठी इतर पक्षांतील मोठ्या नेत्यांना प्रवेशासाठी पक्षाचे कवाडे मुक्तपणे खुली ठेवली आहेत. इतर पक्षातून आलेल्यांना महत्त्वाची पदें, मंत्री, आमदार खासदार केले जात आहे. त्यामुळे जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना फक्त पक्षाचे काम करावे व इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांनी मात्र आमदार, खासदार मंत्री व्हावे असे म्हणन्याची वेळ आली आहे.

Ashok Chavan Nanded Rally
Ashok Chavan : काॅंग्रेस - भाजपमधील नव्या - जुन्या निष्ठावंतांना आपलसं करण्यात अशोक चव्हाण यशस्वी ठरणार?

नांदेड जिल्ह्यात भाजपमध्ये इतर पक्षातून प्रवेश करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आदी पक्षातील नेत्यांच्या समावेश आहे. देश व राज्यातील राजकारणात भाजपचा प्रभाव वाढत गेला तशी भाजपत आवक वाढत गेली आहे.

नांदेडमध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील, माजी मंत्री डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर, माजी आमदार अमरनाथ राजूरकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेतून भाजपत आलेले विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हे आहेत काही ठळक नेते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्ष व झेंडा भाजपचा आसला तरी नेते इतर पक्षातून आलेले आहेत. हे नव्याने प्रवेश केलेल्या नेत्यांच्या हाती भाजपची सूत्रे राहणार आहेत. आता या नेत्यांना पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावा लागणार आहे. आपल्या पक्षाची विचारधारा आणि तत्वांना तिलांजली देऊन पक्ष सोडून जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आशा नेत्यांना आपल्या स्थानिक पातळीवरील काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे काय होईल, याची काही चिंता नाही. त्यांना वाऱ्यावर सोडून परिस्थिती व सोय पाहून पक्षांतर केले जात आहे. आशा परिस्थितीत सामान्य कार्यकर्ता भरडला जात आहे.

Ashok Chavan Nanded Rally
Nanded politics : नांदेडमध्ये दाखल होताच अशोक चव्हाणांंचा काँग्रेसला दणका; भाजपला 55 माजी नगरसेवकांची सलामी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com