Nagaland : Sharad Pawar : Nitish kumar
Nagaland : Sharad Pawar : Nitish kumar Sarkarnama
देश

Nagaland Politics: पवारांनंतर आता नितीश कुमारांच्या आमदाराचा भाजपप्रणित आघाडीला पाठिंबा; कारवाई होणार?

सरकारनांमा ब्यूरो

Nitish Kumar News: नागालँडमध्ये सरकारस्थापनेसाठी तेथील मुख्यमंत्र्यांना आमचा पाठिंबा आहे, आम्ही भाजपशी सहकार्य़ केलेले नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्ट केले आहे. आता जनता दल युनायटेडने सुद्धा नागालँडमधील भाजपप्रणित सरकारला पाठिंबा दिला आहे. नागालँडमध्ये जेडीयू पक्षाचा एकमेव उमेदवार निवडून आला होता. त्यांनी देखील आता सरकारला पाठिंबा दिला आहे.

जेडीयू नागालँड प्रभारी आणि राष्ट्रीय महासचिव अफाक अहमद खान यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) सात आमदार निवडून आले होते, या सात आमदारांनी नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. यानंतर आता जेडीयूने देखील सरकारला पाठिंबा दिला आहे. नागालँड विधानसभा निवडणुकीत (Nagaland Assembly Election) जेडीयूला फक्त एकच जागा जिंकता आली होती. एनपीपी-भाजप युतीनं नागालँडमध्ये सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन केले आहे.

याबाबत जेडीयूने म्हंटलं आहे की, "आमचा पक्ष जेडीयू नागालँड अध्यक्षांनी केंद्रीय नेत्यांशी कसलाही सल्ला न करताच, नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंब्याचं पत्र दिलं आहे, हे अनुशासनच्या विपरित आणि मनमानी पाऊल आहे. केवळ यामुळेच जेडीयूनं नागालँडमधील जेडीयू पक्षाची नागालँड राज्य समिती बरखास्त केली आहे."

बिहारमध्ये जेडीयूने भाजपसोबतची युती संपुष्टात आणल्यानंतर राष्ट्रीय जनता दलासोबत महागठबंधन बनवून सरकार बनवलं आहे. नागालँडमधील आपल्या या आमदाराच्या भूमिकेवर जेडीयू नाराजी व्यक्त केली. नितीशकुमार कुमार हे लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभवासाठी, विरोधी पक्षांची एकजूट करत आहेत. मात्र असे असताना ही त्यांच्या एकमेव आमदाराने भाजपला लिखित पाठिंबा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT