Ashima Mittal News: महिला सरपंचांमध्ये विकास करण्याची क्षमता

आशिमा मित्तल यांच्या हस्ते जिल्हा परिषदेकडून स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांचा सन्मान
Ashima Mittal
Ashima MittalSarkarnama

Nashik News: महिला (Women) सरपंचांनी आपले निर्णय स्वतः घ्यावेत. महिलांचा दृष्टीकोण समतोल व व्यापक असतो. त्यामुळे सरपंचांनी स्वतः निर्णय घेतल्यास नक्कीच त्याचा व्यवस्थेला लाभ होईल. महिलांनी निर्णयप्रक्रीयेत सहभागी होऊन गावांचा सर्वांगीण विकास करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (Ashima Mittal) यांनी केले. (Women Sarpanch shall take her own decision in rural devolopment)

Ashima Mittal
Nashik News; विमानसेवेसाठी आदित्य ठाकरे यांनी घेतला पुढाकार!

जिल्हा परिषद आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त बुधवारी नवीन रावसाहेब थोरात सभागृहात महिला मेळावा झाला. या वेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे महिलांसाठी विविध स्पर्धा झाल्या. तसेच योग साधना, उद्योजकता विकास, महिला कायदेविषयक मागदर्शन, पोषण आहार, महिलांचे सामाजिक प्रश्‍न याविषयी तज्ज्ञ मार्गदर्शकांचे व्याख्यान झाले.

Ashima Mittal
Hasan Mushrif : मुश्रीफांच्या अडचणीत वाढ होणार; ईडीच्या कारवाईनंतर सहकार विभागाचाही 'हा' महत्वपूर्ण आदेश

यावेळी श्रीमती मित्तल यांच्या हस्ते विजेत्या महिला स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले. यावेळी त्या म्हणाल्या, महिलांनी दैनंदिन कामात आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने महिला स्वयंसहाय्यता समूहांसाठी असलेल्या योजनांचा लाभ घ्यावा. जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांसाठी पुढील काळात आरोग्यविषयक मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, प्रभारी कृषी विकास अधिकारी मयूरी झोरे आदी महिला अधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

Ashima Mittal
Chandrakant Khaire News : नामांतराला विरोध आहे, तर मग न्यायालयात जा, आंदोलनाची नौटंकी कशाला ?

यांचा झाला सन्मान

कांचन नरवाडे, आदिशक्ती महिला स्वयंसहाय्यता समूह, कविता भडांगे, स्वप्नपूर्ती स्वयंसहाय्यता गट, हेमलता गाढवे, मीनाक्षी शुबर, झाशीची राणी समूह, भाग्यश्री जाधव, अबोली महिला समूह, सरला महाले, वैष्णवी समूह.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com