Suvendu Adhikari Narada Sting Sarkarnama
देश

West Bengal Bypoll Election : CM सुवेंदू अधिकारी यांनी मतदारसंघ सोडला, खेळले भावनिक कार्ड; पंचरंगी लढत होणार

Suvendu Adhikari Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीत अधिकारींच्या गडात पंचरंगी लढत; हसिरानी रथ यांच्या उमेदवारीवर भाजपचे भावनिक कार्ड, ममता बॅनर्जींसाठी प्रतिष्ठेची परीक्षा.

Rajanand More

Nandigram election update : पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा बालेकिल्ला मानला जात असलेल्या नंदीग्राम मतदारसंघात पुन्हा एकदा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. नेहमीच हायहोल्टेज लढतींचे केंद्रबिंदू असलेल्या या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पंचरंगी लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.

सुवेंदू अधिकारी हे काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्रामसह भवानीपूर मतदारसंघातून विजयी झाले होते. भवानीपूर मध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी नंदीग्राम मतदारसंघ सोडल्याने पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी त्यांनी भावनिका कार्ड खेळले आहे.

भाजपने या मतदारसंघात हसिरानी रथ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्या चंद्रनाथ रथ यांच्या आई आहेत. ते अधिकारी यांचे पीए होते. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांची हत्या करण्यात आली होती. रथ हे अधिकारी यांचे अत्यंत विश्वासू मानले जात होते. त्यामुळे त्यांच्या आईला उमेदवारी दिल्याची चर्चा आहे. या उमेदवारीमुळे मतदारसंघात भावनिक लाट निर्माण होऊ शकते, अशी भाजपची रणनीती आहे.

दरम्यान, भाजपचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांनी उमेदवार दिले आहेत. ममता बॅनर्जी यांनी संचिता प्रधान डे यांना तर बंडखोर गटाने मोहम्मद एतेसमुल हक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस आणि डावे पक्षही मैदानात उतरले आहेत. काँग्रेसने मिलन प्रधान यांना तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने शांती गोपाल गिरी यांना मैदानात उतरविले आहे. त्यामुळे ही लढत पंचरंगी ठरली आहे.

पंचरंगी लढतीत सर्वाधिक लक्ष असेल तर भाजप आणि ममता बॅनर्जींच्या उमेदवारांकडे. या मतदारसंघात भाजपसह तृणमूलचीही ताकद आहे. अधिकारी हे एक टर्म तृणमूलच्या तिकीटावर तर दोन टर्म भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. २००९ ते २०२१ अशी १२ वर्षे या मतदारसंघावर तृणमूलचे वर्चस्व राहिले आहे. मात्र बंडखोरीमुळे ममतांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी परीक्षा असणार आहे. त्यांचा उमेदवार किती मते खेचणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT