Murlidhar Mohol News : मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाहनाला कट मारला; तरुणावर गुन्हा दाखल, कोणते कलम लावले?

Murlidhar Mohol vehicle incident, Pune traffic case : आपल्या ताब्यातील वाहन बेफिकीरपणे चालवून इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्यास या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला जातो.
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol Sarkarnama
Published on
Updated on

Pune news : केंद्रीय राज्यमंत्री मुरलधीर मोहोळ यांच्या वाहनाला भरधाव दुचाकीने कट मारल्याच्या कारणास्तव एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. १३) सप्टेंबरला शिवाजीनगर मधील संचेती चौक परिसरात घडली. बेदरकारपणे दुचाकी चालवत तरुणाने मोहोळ यांच्या ताफ्यातील वाहनास कट मारल्याचा आरोप आहे.

शिवाजीनगर पोलिसांनी नाना पेठेतील शुभम विजय वनित (वय ३२) या तरुणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस फौजदार ईश्वर लक्ष्मण भिकुले यांनी तक्रार दाखल केली आहे. भिकुले हे त्यादिवशी मोहोळ यांच्या सुरक्षेसाठी तैनात होते. रविवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास मंत्र्‍यांचा ताफा संचेती चौक परिसरात आल्यानंतर ही घटना घडली.

पोलिसांनी 'एफआयआर'मध्ये म्हटले आहे की, मंत्री मुरलीधर मोहोळ यांना घेऊन ताफा चौकातून जात असताना शुभम वनित याने दुचाकी भरधाव आणि निष्काळजीपणे चालवत ताफ्याला ओव्हरटेक केले. त्याच्या या पद्धतीच्या वाहनचालकामुळे रस्त्यावरील इतर वाहनचालक तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता होती, असे पोलिसांनी नमूद केले आहे.

Murlidhar Mohol
जावयासाठी बड्या नेत्याचा राजकारणातून संन्यास; पक्षात होता मोठा रुबाब...

कोणती कलमे लावली?

शुभम वनित याच्याविरुध्द भारतीय न्याय संहितेतील कलम २८१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या ताब्यातील वाहन बेफिकीरपणे चालवून इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्यास या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला जातो. याअंतर्गत सहा महिन्यांपर्यंत तुरुंगात किंवा एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षेची तरतुद आहे.

Murlidhar Mohol
Manoj Jarange protest : मुंबईला निघण्याच्या काही तास आधीच मनोज जरांगे पाटलांनी टाकला डाव, आता सरकारची परीक्षा

त्याचप्रमाणे मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ आणि १८५ अंतर्गतही गुन्हा दाखल झाला आहे. या कलमांमध्ये पहिल्या गुन्ह्यासाठी ६ महिने तुरुंगवास किंवा एक हजारांचा दंड किंवा दोन्ही, तसेच या घटनेनंतर तीन वर्षांच्या आता दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी २ वर्षे किंवा २ हजार रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षेची तरदुत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com