Rahul Gandhi, PM Narendra Modi Sarkarnama
देश

Rahul Gandhi on PM Modi : राहुल गांधींनी आता थेट मोदींचं नाव घेत निवडणूक आयोगाला दिलं आव्हान

Narendra Modi’s Victory and the Role of 25 Key Seats : राहुल गांधी यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेत महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातील मतदारयाद्यांमधील घोळाचे पुरावे सादर केले होते.

Rajanand More

Rahul Gandhi’s Strong Criticism on Modi’s Electoral Win : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेत भाजप आणि भारतीय निवडणूक आयोगाकडून मतांची चोरी होत असल्याचा गंभीर आरोप केला. यावेळी त्यांनी कर्नाटकातील एका विधानसभा मतदारसंघातील मतदारयाद्यांमधील घोळाचे पुरावेच दिले. त्यानंतर आता शुक्रवारी त्यांनी बेंगलुरूमध्ये जाऊन निवडणूक आयोग आणि भाजपवर हल्ला चढवला.

राहुल गांधी यांनी महाराष्ट्रासह कर्नाटकातील निवडणुकीत मतांची चोरी झाल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. ते म्हणाले, नरेंद्र मोदी केवळ 25 जागांमुळे पंतप्रधान झाले आहेत. आम्हाला निवडणूक आयोगाकडून इलेक्ट्रॉनिक डेटा मिळाला तर मतांची चोरी करून मोदी पंतप्रधान झाल्याचे आम्ही सिध्द करू, असे आव्हान राहुल यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे.

भाजपने केवळ 35 हजार मतांच्या फरकाने या 25 जागा जिंकल्या असल्याचेही राहुल गांधींनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत भाजपला एकहाती बहुमत मिळालेले नाही. संयुक्त जनता दल आणि चंद्राबाबू नायडू यांच्या जोरावर एनडीएला सत्ता काबिज करता आली आहे. यापार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी 25 लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख केल्याचे दिसते.

बेंगलुरूतील रॅलीमध्ये बोलताना राहुल म्हणाले, महाराष्ट्र आणि कर्नाटकातून आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार एक कोटी नव्या लोकांनी मतदान केले आहे. ते लोकसभेतमध्ये मतदान करण्यासाठी आले नव्हते. ते 1 कोटी लोक विधानसभा निवडणुकीत जादूने मतदान करण्यासाठी आले. या वाढलेल्या मतांच्या आधारे त्यांनी निवडणूक जिंकल्याचा आरोप राहुल यांनी केला.

कर्नाटकातही आम्ही 16 जागांवर जिंकत होतो. पण केवळ 9 जागा मिळाल्या. येथेही घोटाळा झाला आहे. त्यावर निवडणूक आयोग काहीच उत्तर देत नाही. भाजप आणि निवडणूक आयोग लोकशाहीची हत्या करत आहेत. प्रत्येक हिंदूस्थानी नागिरकाला आपले संविधान मतांचा अधिकार देते. आपल्याला त्याचे रक्षण करायला हवे. आम्ही संविधानाचेही रक्षण केले होते. मागील निवडणुकीत भाजपने संविधानावर हल्ला केला होता. भाजप घटनात्मक संस्थांना संपवू इच्छित असल्याची टीका राहुल यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT