BJP Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : भाजप 100 उमेदवारांची नावे जाहीर करणार; 'या' बड्या नेत्यांचा सहभाग

Narendra Modi, Amit Shah : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी भाजपची तयारी

Sunil Balasaheb Dhumal

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम पुढील महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजपने 400 प्लस जागा जिंकण्याचा चंग बांधला आहे. त्या दृष्टीने भाजपने पावले उचलण्यासही सुरुवात केली आहे. लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी भाजप आपल्या 100 उमेदवारांची घोषणा गुरुवारी करण्याची शक्यता आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाचाही समावेश असण्याची शक्यता आहे. एनडीएला 400 हून अधिक जागा जिंकण्यासाठी ही यादी महत्वपूर्ण ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (Lok Sabha Election 2024)

दरम्यान, लोकसभेत सर्वाधिक खासदार पाठवणाऱ्या उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी भाजप अनेक बैठका घेत आहे. उत्तर प्रदेशबाबत शनिवारी झालेल्या बैठकीला गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह इतर महत्वाचेही नेते उपस्थित होते. 2019 च्या निवडणुकीत भाजपने राज्यातील 80 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या. तसेच पश्चिम बंगाल, तेलंगणा, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांवर चर्चा होणार आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई बैठकीसाठी नवी दिल्लीत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या आठवड्यात, पंतप्रधानांनी भाजप (BJP) नेते आणि कार्यकर्त्यांना 370 जागा जिंकण्याचे पक्षाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी पुढील 100 दिवस महत्त्वपूर्ण असतील, याची आठवणही करून दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चर्चांमध्ये ज्या राज्यांमध्ये कमकुवत आहे, त्या राज्यात भाजप लक्ष केंद्रीत करत आहे. भाजप त्या जागांसाठी उमेदवारांची यादी लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले, आपल्याला सत्तेसाठी नाही तर देशाच्या विकासासाठी निवडणूक जिंकायची आहे. आपण राजनीती नाही तर राष्ट्रनीती करत आहोत. आपल्याला लोकांचा विश्वास जिंकायचा आहे. एनडीएला 400 पर्यंत नेण्यासाठी भाजपला 370 (जागा) चा टप्पा पार करावा लागेल. त्यासाठी पुढील 100 दिवसांत, आपण सर्वांना प्रत्येक नवीन मतदार, प्रत्येक लाभार्थी, प्रत्येक समाजापर्यंत पोहोचायचे आहे, असे आवाहनच त्यांनी राष्ट्रीय अधिवेशनात केले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT