Nashik BJP : भाजप निवडणूक तयारीच्या बैठकीकडे बूथप्रमुखांनीच फिरवली पाठ; नाशिकमध्ये नेमकं काय झालं?

Radhakrishna Vikhe Patil : क्लस्टर अध्यक्ष विखे पाटील यांनी गैरहजर बूथ प्रमुखांना दिली तंबी
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

Nashik Lok Sabha Politics : दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या क्लस्टर मिटिंगची जोरदार तयारी करण्यात आली होती. भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुकीसाठी मोठे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मात्र त्याला काल चक्क पक्षातील कार्यकर्त्यांनीच अपशकून केला. त्यामुळे भाजपमध्ये नेमके चाललंय तरी काय, अशी चर्चा नाशिकमध्ये सुरू आहे. (Nashik BJP)

भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटी आणि क्लस्टर बैठक काल दिंडोरी (Dindori) येथे झाली. या बैठकीला क्लस्टर अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील, सहअध्यक्ष आमदार डॉ. राहुल आहेर आणि केंद्रीय निरीक्षक व्होरा उपस्थित होते. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने रणनीतीचा भाग म्हणून या बैठकीकडे पाहिले जात होते. मात्र जेवढा गाजावाजा आणि संघटनात्मक स्तरावर तयारीची चर्चा होती, तेवढ्या प्रतिसाद या बैठकीला मिळाला नाही, असे बोलले जाते.

BJP
Sharad Pawar On Modi Guaranty : 'मोदी गॅरंटी'ची शरद पवारांनी उडवली खिल्ली; म्हणाले...

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) निवडणूक यंत्रणेत बूथ प्रमुख पन्नाप्रमुख आणि विविध स्तरावरच्या सहा समित्यांना विशेष महत्त्व आहे. या समित्यांद्वारे थेट मतदारांशी संपर्क केला जातो. मतदानाचे अपेक्षित प्रमाण साध्य करण्यासाठी बूथ प्रमुख यंत्रणा अतिशय महत्त्वाची आहे. नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत 1900 बूथ आहेत. या प्रत्येक बुथवर बूथप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र काल झालेल्या क्लस्टर बैठकीत यातील सुमारे चारशे ते साडेचारशे बूथ प्रमुख उपस्थित होते. बहुतांश बूथ प्रमुखांनीच निवडणूक तयारीच्या बैठकीला पाठ फिरवल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. त्याची या बैठकीत विशेष चर्चा घडली.

BJP
Devendra Fadnavis : आता तुतारी कुठे वाजते, कशी वाजते ते समजेल; फडणवीसांचा टोला

यावेळी क्लस्टर प्रमुख महसूल मंत्री डॉ. विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली. एकीकडे नाशिक मतदारसंघावर भाजप आपला दावा सांगत आहे. आणि दुसरीकडे मूलभूत यंत्रणेतील कार्यकर्तेच उदासीन राहत असतील तर कसे होणार?. आपल्याला निवडणूक जिंकायचे असेल तर कार्यकर्त्यांनी मनापासून आणि शिस्तीने काम केले पाहिजे. प्रत्येक बूथ प्रमुखांनी मिटिंगला हजर राहायला हवे होते, तसे घडताना दिसत नाही. मग जागा मिळविण्यासाठी दबाव कसा निर्माण होईल? असे त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.

याबाबत नाशिक (Nashik) लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख केदा आहेर यांच्याशी संपर्क केला असता, काही बूथप्रमुख गैरहजर होते याला त्यांनी दुजोरा दिला. मात्र निवडणूक तयारीची ही बैठक असल्याने अडचणी काय काय असू शकतात याचा बोध अशा बैठकांतूनच होतो. गैरहजर बूथ प्रमुखांची संपर्क करून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जाणार आहेत. यापुढे बैठकीला अपेक्षित असलेले सगळेच घटक उपस्थित रहावे यासाठी पदाधिकारी प्रयत्न करणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

BJP
Amol Mitkari On Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांनी फुंकलेल्या तुतारीने अमोल मिटकरींचे हातही थरथरले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com