PM Narendra Modi On China : PM Modi Interview Sarkarnama
देश

PM Modi Interview : पंतप्रधान मोदींनी चीन-पाकिस्तानचा आक्षेप फेटाळून लावला; मुलाखतीतील '1O' ठळक मुद्दे..

PM Narendra Modi On China : नऊ वर्षांच्या बहुमतातील राजकीय स्थिरतेमुळे भारतात अनेक सुधारणा झाल्या

Chetan Zadpe

Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली बाजू मांडली आहे. मोदी म्हणाले , "भारताच्या G20 अध्यक्षपदाचे अनेक सकारात्मक परिणाम झाले आहेत. याच्या काही आठवणी माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहेत. विकसित भारतात जातीवाद, भ्रष्टाचार आणि प्रादेशिकवादाला थारा नसल्याचंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

नरेंद्र मोदी म्हणाले, "महागाई ही जगासमोरील प्रमुख समस्या आहे. G - 20 या परिषदेत या गोष्टीला मान्यती मिळाली आहे की, एका देशातील महागाईविरोधीतील धोरणे इतर देशांना हानीकारक ठरत नाहीत. G20 च्या भारताच्या अध्यक्षपदाने तिसऱ्या जगातील देशांमध्येही आत्मविश्वासाची बीजे पेरली आहेत."

रेवडी (लांगूलचालन) कल्चरला विरोध करताना मोदी म्हणाले की, "बेजबाबदार आर्थिक धोरणे, लोकप्रिय घोषणा, अशा प्रकाराने अल्पकालीन राजकीय इस्पित साध्य केलं जाऊ शकतं, परंतु दीर्घकाळात याची मोठी सामाजिक आणि आर्थिक किंमत चुकवावी लागत असते. बेजबाबदार आर्थिक धोरणे आणि लोकप्रिय घोषणांच्या आश्वासनांमुळे गरीब आणि सामान्य लोकांना सर्वात जास्त त्रास होत आहे. देशातील नऊ वर्षांच्या बहुमतातील राजकीय स्थिरतेमुळे भारतात अनेक सुधारणा झाल्या आहेत. त्यामुळे देशात विकास झाला आहे," असेही मोदी म्हणाले.

"चुकीच्या आणि खोडसाळ बातम्यांमुळे समाजात अराजकता निर्माण होऊ शकते. बातम्यांच्या स्रोतांच्या विश्वासार्हतेला हानी पोहोचू शकते. याचा परिणाम विघातक होऊन, सामाजिक अशांतता वाढू शकतो. सायबरस्पेसने बेकायदेशीर आर्थिक घडामोडींच्या विरोधात आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक नवा आयाम सादर केला आहे. सायबर धमक्या गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. सायबर दहशतवाद, ऑनलाइन कट्टरविचार, मनी लाँड्रिंग हे तर निव्वळ हिमनगाचे टोक आहे. दहशतवादी विध्वंसक हेतू पूर्ण करण्यासाठी डार्कनेट, मेटाव्हर्स, क्रिप्टोकरन्सी वापरत आहेत," असेही मोदी म्हणाले.

रशिया-युक्रेन युद्धावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, "हा संघर्ष मुत्सद्दीपणानेच सोडवणे हा मार्ग आहे. काश्मीर, अरुणाचलमध्ये G20 बैठकीच्या आयोजनावर पाकिस्तान, चीनचा आक्षेप हा मोदींनी फेटाळून लावला आहे. देशाच्या प्रत्येक भागात परिषदा होणार आहेत, असे मोदींनी स्पष्ट केले.

"केवळ एका दशकाच्या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्था पहिल्या पाच अर्थव्यवस्थेत पोहचला आहे. माझ्या तिसऱ्या कालखंडात भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थापैकी एक असणार आहे. मागील कालखंडात भारताकडे भुकेल्यांचा देश म्हणून पाहिले जात होते, पण आता परिस्थिती बदलत आहे. आज भारतीयांना विकासाचा साध्य करण्यासाठी मोठी संधी आहे," असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT