Modi Will Contest Lok Sabha In Pune : गुजरात, यूपीनंतर मोदी लोकसभा लढविणार महाराष्ट्रात?; काँग्रेसच्या 'या' आमदाराने दिले आव्हान

गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेली पुण्याची पोटनिवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेची आगामी निवडणूक पुण्यात लढणार असल्याची चर्चा सकाळपासून सुरू झाली आहे. त्यामुळे गुजरात, उत्तरप्रदेशनंतर मोदी आता महाराष्ट्रातून निवडणूक लढविणार का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यावर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. (Narendra Modi will contest the Lok Sabha elections from Pune)

देशात सध्या निवडणुकीची तयारी सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदारपणे सुरू आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला टक्कर देण्यासाठी इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली देशातील २८ पक्ष एकत्र आले आहेत. दोन्ही बाजूंकडून तयारीला वेग आलेला आहे. असे असताना आज एक नवीन बातमी समोर आली आहे, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Narendra Modi
Ajit Pawar On One Nation-One Election : ‘वन नेशन वन इलेक्शन’चे अजित पवारांकडून स्वागत; महायुतीच्या सभेत पाठिंब्याची घोषणा

गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेली पुण्याची पोटनिवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. त्यातच देशात ‘वन नेशन वन इलेक्शन’चे वारे वाहू लागले आहे, त्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्यातच संसदेचे विशेष अधिवेशनही मोदी सरकारने बोलावले आहे, त्यामुळे ‘वन नेशन-वन इलेक्शन’ची शक्यता वाढली आहे. मात्र, त्यासाठी लोकसभेची निवडणूक लवकर घ्यावी लागू शकते.

पंतप्रधान नरेंद्र यांनी आतापर्यंत गुजरात, उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवली आहे. त्यात २०१४ च्या निवडणुकीत मोदींनी गुजरातचे मणिनगर अणि उत्तर प्रदेशमधील वाराणसीमधून निवडणूक लढवली होती. या दोन्ही ठिकाणाहून त्यांनी विजय मिळविला होता. पण, गुजरातमधील मणिनगरचे सदस्यत्व त्यांनी सोडले होते वाराणसीचे खासदार म्हणून राहणे त्यांनी पसंत केले.

Narendra Modi
Ajit Pawar Speech: चंद्र-सूर्य असेपर्यंत कुणाचा बाप मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही;अजित पवारांनी ठणकावले

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी वाराणसीमधून निवडणूक जिंकली हेाती. आता पुन्हा त्यांची चर्चा पुण्यासाठी रंगली आहे. त्यामुळे मोदी गुजरात, उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या राज्यातील नेत्यांनी मोदी यांनी राज्यातून निवडणूक लढवावी, अशी मागणीच केली आहे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही त्यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की पंतप्रधाान नरेंद्र मोदी यांनी जर का पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवली, तर चांगलंच आहे. मोदींना कुठेही कोणी नाकारणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Narendra Modi
Mahayuti Meeting : आम्ही घड्याळाच्या चिन्हावरच निवडणुका लढवणार;तटकरेंनी महायुतीच्या बैठकीतून रणशिंग फुंकले

मोदींचे स्वागत; पण निवडणूक आम्ही जिंकू : धंगेकर

पुणे शहरातून निवडणूक लढविण्यासाठी आम्ही नरेंद्र मोदी यांचे स्वागत करतो. काँग्रेसकडून मला उमेदवारी मिळाली तर नेतृत्वाच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मी शंभर टक्के निवडून येईन. मोदी जर पुण्यात आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू; पण निवडणूक आम्ही जिंकू, असे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com