Narendra Modi And Donald Trump Sarkarnama
देश

Narendra Modi Vs Donald Trump : मोदींना दोस्त म्हणत ट्रम्प यांची मोठी घोषणा; पंतप्रधानांनीही दिलं उत्तर…

Donald Trump Calls Narendra Modi a Friend : भारत आणि अमिरेका जवळचे दोस्त आणि नैसर्गिक पार्टनर आहेत. आमची व्यापारविषयक चर्चा भारत आणि अमेरिकेतील अनिर्बंध शक्यतांचे मार्ग मोकळे करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

Rajanand More

India US Trade Relations : रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर प्रचंड नाराज आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांनी भारतावर 50 टक्के टेरिफ लावला आहे. तो आणखी वाढविण्याच्या विचारात ते आहेत. भारत आपल्यापासून दुरावल्याची पोस्ट त्यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती. त्यानंतर बुधवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खूप चांगले दोस्त असा उल्लेख करत मोठे संकेत दिले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मला घोषणा करण्यात आनंद होत आहे की, भारत आणि अमेरिकेतील व्यापारविषयक अडतचणी दूर करण्यासाठी चर्चा सुरू आहे. मी माझे खूप चांगले दोस्त पंतप्रधान मोदी यांच्याशी पुढील आठवड्यांत चर्चेसाठी उत्सुक आहे. मला विश्वास आहे की, या दोन महान देशांमध्ये चर्चेतून चांगला निष्कर्ष निघेल.

ट्रम्प यांच्या सोशल मीडियातील या अनपेक्षित पोस्टला पंतप्रधान मोदींनी लगेच उत्तर दिलं आहे. भारत आणि अमिरेका जवळचे दोस्त आणि नैसर्गिक पार्टनर आहेत. आमची व्यापारविषयक चर्चा भारत आणि अमेरिकेतील अनिर्बंध शक्यतांचे मार्ग मोकळे करेल. या मुद्द्यावर चर्चेसाठी आमच्या टीम काम करत आहेत. राष्ट्रपती ट्रम्प यांच्याशी बोलण्याबाबत मीही उत्सुक आहे. दोन्ही देशांतील लोकांच्या समृध्द भविष्याच्या दिशेने आम्ही काम करू, असे मोदी म्हणाले आहेत.

ट्रम्प यांनी यापूर्वीही मोदींचा उल्लेख चांगले दोस्त म्हणून अनेकदा केला आहे. मात्र, मागील काही महिन्यांत दोन्ही देशांतील व्यापारविषयक संबंध ताणले गेले आहेत. मागील आठवड्यात ट्रम्प यांनी म्हटले होते की, मी पंतप्रधान मोदींचा नेहमीच दोस्त राहील. ते एक महान पंतप्रधान आहेत. पण सध्या ते जे करत आहेत, ते मला पसंत नाही. असे असले तरी भारत आणि अमेरिकेचे संबंध खास आहेत. कधी-कधी आमच्यात थोडे मतभेद होतात.

दरम्यान, भारत आणि अमेरिकेतील व्यापारविषयक कराराबाबतची चर्चा मागील काही दिवसांपासून रेंगाळली आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवावे, यासाठी अमेरिकेकडून दबाव टाकला जात आहे. त्यासाठी 50 टेरिफ लादण्यात आला आहे. पण भारत माघार घेण्यास तयार नाही. अमेरिकाही टेरिफ वाढविण्याची धमकी देत आहे. यापार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी पुढे केलेला हात आणि त्याला पंतप्रधान मोदींनी दिलेले आश्वासक उत्तर दोन्ही देशांच्या अपेक्षा वाढविणारे ठरले आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT