Narendra Modi And Donald Trump Sarkarnama
देश

Donald Trump on PM Modi : मोदी हे ‘किलर’, नायसेस्ट लुकिंग..! डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा 'तो' वाद उकरून काढला...

Donald Trump Lauds Narendra Modi’s Leadership : पाकिस्तानचे पंतप्रधानही एक चांगले व्यक्ती आहेत. त्यांचे एक फील्ड मार्शल आहेत. तुम्हाला माहिती आहे की, ते फील्ड मार्शल का आहेत? ते एक फायटर आहेत, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.

Rajanand More

US President Comments on India-Pakistan Ceasefire : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वाद उकरून काढला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील युध्द थांबविल्याचा दावा करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर नेमका कोणता संवाद झाला, हे सांगतिले आहे. पंतप्रधान मोदींविषयी त्यांनी किलर, नायसेस्ट लुकिंग, टफ लाईक हेल... असे शब्दही वापरले आहेत.

दक्षिण कोरियातील बसान येथील एपेक सीईओ समिटमध्य बोलताना ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींबरोबरच पाकिस्तानेच पंतप्रधान आणि लष्करप्रमुखांचेही कौतुक केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, मी भारतासोबत व्यापार करार करत आहे. मला पंतप्रधान मोदींबद्दल खूप आदर आणि प्रेम आहे. आमचे संबंध खूप चांगले आहेत.

पाकिस्तानचे पंतप्रधानही एक चांगले व्यक्ती आहेत. त्यांचे एक फील्ड मार्शल आहेत. तुम्हाला माहिती आहे की, ते फील्ड मार्शल का आहेत? ते एक फायटर आहेत. मी त्या सर्वांना ओळखतो. सात विमाने पाडल्याचे मी वाचले. हे दोन अण्वस्त्रधारी देश आहेत, असे सांगत ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपणच शस्त्रसंधी कशी घडवून आणली याचा राग आळवला.

ट्रम्प म्हणाले, ‘’मी पंतप्रधान मोदींना फोन केला आणि म्हणालो, आम्ही तुमच्याशी व्यापार करार करू शकत नाही. त्यावर मोदी म्हणाले, ‘नाही, नाही, आपल्याला व्यापार करार करावा लागेल.’ मी म्हणालो, नाही, आम्ही करू शकत नाही. तुम्ही पाकिस्तानशी युद्ध सुरू केले आहे. आम्ही करणार नाही.’’

पंतप्रधान मोदींशी बोलल्यानंतर मी पाकिस्तानला फोन केल्याचे सांगत ट्रम्प म्हणाले, ‘’आम्ही तुमच्याशी व्यापार करणार नाही कारण तुम्ही भारताशी लढत आहात. त्यावर ते म्हणाले, ‘नाही, नाही, तुम्ही आम्हाला लढू द्या.’ ते दोघेही बलवान देश आहेत. पंतप्रधान मोदी चांगले व्यक्ती आहेत. ते ‘किलर’ आहेत. ते ‘टफ अज हेल’ आहेत," असे कौतकही ट्रम्प यांनी केले. दोन दिवसांनी, त्यांनी फोन केला आणि सांगितले, आम्हाला समजले, आणि त्यांनी लढणे थांबवले, असा दावाही ट्रम्प यांनी केला.

दरम्यान, ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताने यापूर्वी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी केली नसल्याचे भारताने सांगितले आहे. पण त्यानंतर ट्रम्प यांच्याकडून सातत्याने हा दावा केला जात आहे. हा मुद्दा विरोधकांकडूनही सातत्याने उचलून धरला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT