Local Body Elections : ‘स्थानिक’चं मैदान मारण्यासाठी भाजपचा अजितदादांसह शिंदेंनाही ‘दे धक्का’; वाचा ‘मेगाप्रवेशा’ची संपूर्ण यादी...

BJP’s Strong Push Ahead of Local Body Elections : गेवराई विधानसभा मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेतील माजी आमदार बदामराव पंडित यांनी आज मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवश केला.
BJP Maharashtra politics
BJP Maharashtra politicsSarkarnama
Published on
Updated on

Former MLAs and Party Officials Likely to Join BJP : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असली तरी त्यामध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. विधानसभा निवडणुकीत विक्रमी जागा मिळवत सत्ता काबीज केल्यानंतर आता भाजपने आपला मोर्चा महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपरिषदांवर आपला झेंडा फडकविण्यासाठी तगडी फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे.

भाजपने विविध पक्षातील नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी जाळं टाकलं असून त्यामध्ये मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नेतेही अडकत आहेत. आज मुंबईत भाजपमध्ये मेगा प्रवेश होणार आहेत. त्यामुळे या मित्रपक्षांतील माजी आमदारांवर अनेक पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील एका माजी आमदारानेही आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

गेवराई विधानसभा मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेतील माजी आमदार बदामराव पंडित यांनी आज मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवश केला. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पक्षातील विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांना शह देण्याची रणनीती आखण्यात आल्याची चर्चा आहे. बदामदाव पंडित तीनवेळी या मतदारसंघाचे आमदार होते.

BJP Maharashtra politics
Sharad Pawar News : 'स्थानिक'साठी शरद पवारांची रणनीती ठरली; भाजपसोबत युतीबाबत काय दिले आदेश?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड यांनी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सोलापूर जिल्ह्यातही अजित पवारांना भाजपने मोठा धक्का दिला आहे. माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रवेशाची चर्चा होती. त्यांच्यासोबत सोलापूर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारीही भाजपसोबत जाणार असल्याने भाजपची ताकद वाढणार आहे.

वाचा पक्षप्रवेशाची संपूर्ण यादी –

-    माजी आमदार राजन पाटील

-    माजी आमदार यशवंत माने

-    लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील

-    मोहोळ नगरपरिषद उपनगराध्यक्ष प्रमोद डोके

-    सोलापूर राष्ट्रवादी उपाध्यक्ष राजाभाऊ गुंड पाटील

-    राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील

-    राष्ट्रवादी मोहोळ तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे

-    मोहोळ शहर राष्ट्रवादी उपाध्यक्ष कुंदन धोत्रे

BJP Maharashtra politics
Pune Crime : पुणे हादरलं! आयटी इंजिनिअर निघाला अल-कायदाचा संशयित दहशतवादी; कोंढव्यात ATS ची मोठी कारवाई

-    राष्ट्रवादी सोलापूर जिल्हा पाध्यक्ष दीपक माळी

-    राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष अस्लम चौधरी

-    सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक सचालक भारत सुतकर

-    मोहोळ पंचायत समिती सभापती रत्नमाला पोतदार

-    सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य सज्जनराव पाटील

-    मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती धनाजी गावडे

-    बाजार समिती उपसभापती प्रशांत बचुटे

-    सोलापूर जिल्हा परिषद माजी कृषि सभापती जालिंदर लांडे

-    राष्ट्रवादी सोलापूर जिल्हा महिला उपाध्यक्षा ज्योत्स्ना पाटील

-    मोहोळ राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष सिंधूताई वाघमारे

-    मोहोळ राष्ट्रवादी शहर तालुका अध्य७ यशोदा कांबळे

-    राष्ट्रवादी विद्यार्थी तालुका अध्यक्ष विश्वजित पाटील

-    राष्ट्रवादी मोहोळ विधानसभा मतदारसंघ राहुल मोरे व बाळासाहेब भोसले.

-    मोहोळ विधानसभा (२०१९) एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नागनाथ क्षीरसागर

-    सोलापूर शिवसेना युवा नेते सोमेश क्षीरसागर

-    खटाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष नंदकुमार मोरे

-    माण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अध्यक्ष बाळासाहेब सावंत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com