Gujrat Onion
Gujrat Onion Sarkarnama
देश

Onion Export News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; गुजरातच्या कांद्याची होणार निर्यात

Sunil Balasaheb Dhumal

Delhi Political News : कांदा निर्यातबंदीमुळे राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी मागे घेण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. त्याकडे मात्र कायम डोळेझाक केल्याचा आरोप राज्यातील शेतकऱ्यांकडून केला जात आहे. यातच केंद्राने गुजरातच्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. केंद्राचा हा निर्णय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे. परिणामी सरकारविरोधात रोष वाढण्याची शक्यता आहे. Narendra Modi permit to Export Gujrat Onion.

लोकसभा निवडणूक Lok Sabha जाहीर होण्यापूर्वी डिसेंबरपासून कांदानिर्यात बंदीचा निर्णय झाला. हा निर्णय सुरुवातीस ३१ मार्चपर्यंत ठेवण्याचा झाला होता. मात्र त्यानंतर तो कायम ठेवण्यात आल्याने राज्यातील शेतकरी नाराज झाले आहे. शहरातील मतदारांची भलामण करण्यासाठी भाजप सरकार आम्हाला वाऱ्यावर सोडत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होऊ लागला आहे. असे असतानाही गुजरातच्या पांढऱ्या कांदाची मात्र निर्यातीस परवानगी दिली आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापणार आहे.

केंद्रातील भाजप BJP सरकारने गुजरातमधील दोन हजार मेट्रीक टन पांढरा कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे. याबाबत वाणिज्य मंत्रालयाने परिपत्रक काढले आहे. या पांढऱ्या कांद्याची निर्यात ही गुजरातमधील मुंद्रा पोर्ट, पिपापवा पोर्ट आणि जेएनपीटी पोर्टवरून होणार आहे. या कांद्याची निर्यात एनसीएलच्या माध्यमातून न करता थेट करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यातील अनेक उद्योग गुजरातला पळवल्याचा आरोप होत आहे. यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi देशातील राज्याराज्यांत भेदभाव करत असल्याची भावना बळावली आहे. यावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी केंद्रासह राज्य सरकारवर सडकून टीका केली. त्यानंतर पुन्हा एकदा कांदा निर्यातीवरून पक्षपाती केल्याचा आरोप होऊ लागला आहे. राज्यात डिसेंबर २०२३ पासून कांदा निर्यात बंदी असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यावर कोणताही निर्णय घेतला जात नाही. त्यातच गुजरातमधील दोन हजार मेट्रीक टन पांढरा कांद्याच्या निर्यातीस परवानगी दिली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांत रोष निर्माण होण्याची शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT