Ajit Pawar News : अजितदादांची राहुल कुलांना मोठी ऑफर; घड्याळ हाती घेतलं तर...

Lok Sabha Election and Rahul Kul : बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार आणि राहुल कुल असा मोठा संघर्ष पाहायला मिळालेला आहे. आता मात्र येथून खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी नणंद-भावजय लढत होत आहे.
Ajit Pawar, Rahul Kul
Ajit Pawar, Rahul KulSarkarnama

Baramati Lok Sabha Politics : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर राज्यातील राजकीय स्थिती बदललेली आहे. या बदलत्या स्थितीत पूर्वीचे कट्टर विरोधक आता मांडीला मांडी लावून बसलेले दिसतात. त्यातच आता लोकसभा निवडणूक लागली असून, बेरजेचे गणित जुळवण्यासाठी सर्व नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने बारामती Baramati लोकसभा मतदारसंघात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. यातूनच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजप नेते आमदार राहुल कुल यांना थेट मंत्रिपदाचीच ऑफर दिली आहे.

दौंड येथील सभेत अजित पवार Ajit Pawar बोलत होते. या वेळी महायुतीचे सर्व स्थानिक नेते उपस्थित होते. पवार म्हणाले, आजपर्यंत आम्ही एकमेकांविरोधात लढलो आहोत. आता मात्र राजकीय समीकरणे बदलली आहेत. राहुल कुल राष्ट्रवादीत आले तर, उद्याच त्यांना मंत्री करतो. आपला शब्द म्हणजे शब्द असतो, अशी थेट ऑफरच अजितदादांनी दिली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून तरी राहुल यांना मंत्री करायला सांगतो, असेही पवार म्हणाले. अजित पवारांच्या या ऑफरने राजकीय वर्तुळातून मात्र भुवया उंचावल्या आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार आणि राहुल कुल Rahul Kul असा मोठा संघर्ष पाहायला मिळालेला आहे. आता मात्र येथून खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार असा नणंद-भावजय लढत होत आहे. यासाठी पत्नी सुनेत्रा पवारांसाठी अजितदादांनी मतदारसंघात मोठी फिल्डिंग लावली आहे. इंदापुरातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना शब्द दिला आहे. तसेच पुरंदरचे नेते माजी मंत्री विजय शिवतारेंना आपलेसे केले. त्यानंतर अजित पवारांनी दौंडकडे मोर्चा वळवल्याचे दिसते. यातूनच त्यांनी राहुल कुल यांना थेट मंत्रिपदाची ऑफर दिल्याची चर्चा आहे.

Ajit Pawar, Rahul Kul
Eknath Shinde Govt : ऐन लोकसभेत 21 साखर कारखान्यांना कर्जाची गॅरंटी; 'या' सत्ताधारी नेत्यांना फायदा

अजित पवार म्हणाले, कांचन कुल Kanchan Kul आपल्या घरच्याच आहेत. गत वेळी निवडणुकीत जे काही झाले ते गंगेला मिळाले. मात्र, त्यावेळी जे खासदार निवडून संसदेत गेले, ते फक्त भाषणच करतात. भाषणे करून विकास करता येत नाही. लोकांच्या समस्या सुटत नाहीत. आता शब्द देतो की राहुलला आणि तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. राहुल यांना घड्याळ हाती घ्यायला सांगा, त्यांना उद्या मंत्री करतो. ते आले तर त्यांना आपण उद्या मंत्री करणार. हा पोरगा चांगला आहे, असे मी उद्याच फडणवीसांना सांगणार आहे की त्यांना मंत्री केले तर आमदार वाढतील, असेही पवारांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

R

Ajit Pawar, Rahul Kul
Baramati Loksabha News : सुनंदा पवारांनी स्पष्टच सांगितलं; शेवटच्या दोन, तीन दिवसांत धनशक्तीचा वापर होणार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com