Rahul Gandhi, Narendra Modi Sarkarnama
देश

Rahul Gandhi On Narendra Modi : पेटलेल्या मणिपूरवर मोदी निर्लज्जपणे हसत राहिले; राहुल गांधी भडकले

सरकारनामा ब्यूरो

Delhi News : मणिपूरमधील हिंसाचारावरून आलेल्या अविश्वासाच्या ठरावावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस नेत्यांना संसदेत उत्तर दिले. पण मोदींच्या भाषण हिंसाचाराचे राजकारण असल्याचे सांगून काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदींनी पुन्हा एकदा घेरले. मणिपर पेटले असताना त्यावर उपाय शोधून ते शांत करण्यापेक्षा मोदी निर्लजपणे हसत असल्याकडे लक्ष वेधून राहुल यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. मोदींचे भाषण, त्या भाषणाची पध्दत, त्यातील मुद्दे, विशेषतः हसणे हे मोदींना पंतप्रधान म्हणून शोभणारे नाही, हे सांगायलाही राहुल विसरले नाहीत. परिणामी, लोकसभेतील मोदींच्या भाषणावर काँग्रेस आता आक्रमक झाल्याचे दिसत आहे. (Latest Political News)

संसदेत विरोधकांनी मणिपूरमधील हिंसाचारावरून अविश्वासाचा ठराव आणला होता. यावर तीन दिवसांच्या चर्चेनंतर गुरुवारी पंतप्रधान मोदींनी सुमारे अडीच तासाच्या भाषणात उत्तर दिले. यावेळी पहिल्या तासाभरात मोदी मूळ मुद्दा असलेल्या मणिपूरवर एकही शब्द काढला नसल्याने विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांच्या 'वॉकआउट'नंतर मोदींनी मणिपूरच्या मूळ विषयला हात घातला तोही काही मिनिटेच, असे सागंत राहुल गांधींनी मोदींच्या संसदेतील भाषणाचा समाचार घेतला.

भारतमातेची मणिपूरमध्ये हत्या झाली, या आपल्या अधिवेशनातील वक्तव्यावर ठाम राहत राहुल गांधींनी त्याचे स्पष्टीकरण दिले. "मणिपूरमध्ये गेलो त्यावेळी आम्हाला मतैई आणि कुकी इशारा दिला होता. मतैई भागातील लोकांनी सांगितले की आमच्या सुरक्षा व्यवस्थेत कुणी कुकी समजाचा व्यक्ती असेल तर त्याला मारू, तेच वाक्य मतैईबाबात कुकींचेही होते. त्यानुसार आम्हाला निर्णय घ्यावा लागला. याचा अर्थ मणिपूर राज्य विभागले आहे. तेथील दोन समजातील वितुष्टता टोकाला गेल्यानेच मी भारतमातेची हत्या झाल्याचा उल्लेख केला. ती उपमा नसून सत्यच बोललो आहे.", असे गांधींनी सांगितले.

"अधिवेशनात विरोधकांनी मणिपूरमधील सत्यस्थितीचे वर्णन केले. तेथील काय आवस्थेबाबत विरोधकांनी संसदेत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्याची मोदींनी खिल्ली उडवली. ते संसदेत निर्लज्जपणे हसत होते. देशाचा एक भाग पेटत असताना पंतप्रधान मोदींना असे हसणे शोभणारे नाही. विषय पेटणाऱ्या मणिपूरचा होता, काँग्रेस किंवा विरोधकांचा नव्हता. असे असतानाही संसदेत मोदी दोन तास मणिपूरची चेष्ठा करत राहिले", अशा शब्दात गांधींनी मोदींचा समाचार घेतला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT