Rahul Gandhi On Narendra Modi : मोदींना मणिपूर जाळायचेच आहे; राहुल गांधी कडाडले

Manipur Violence : मणिपूर पेटत असताना संसदेत मोदी चेष्टा करत होते
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : मणिपूरमधील हिंसाचार धुमसत असतानाच सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेसमध्ये धुमश्चक्री होऊ लागली आहे. या घटनेवरून अधिवेशनात मोदी सरकारवर जबरदस्त हल्ले चढवलेल्या काँग्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जशास तसे उत्तर दिले. मात्र, मणिपूरच्या हिंसाचारावर मोदी गंभीर नसून, लोक मरत असतानाही ते हसत राहिले. मोदींना पटलेले मणिपूर जाळायचच असून, ते शांत करायचे नाही, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदींच्या भाषणाचा समाचार घेतला. मोदी हे मणिपूर सोडून काँग्रेस, विरोधकांवर बोलण्यात अडकले होते, असे सांगून राहुल यांनी मोदींच्या भूमिकेवर बोट ठेवले. (Latest Political News)

Rahul Gandhi
Amit Shah Lok Sabha Speech : राजद्रोह कायदा रद्द होणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची मोठी घोषणा

मणिपूर गेले तीन महिने पेटत असताना एकदाही देशाच्या पंतप्रधनांना तेथे जाऊ वाटले नाही. काही कारणांमुळे त्यांना तेथे जाता येत नसेल हे समजू शकतो, मात्र त्यावर ते बोलू तरी शकत होते. आपल्या देशाच्या आर्मीला एकच आदेश दिला तर ते दोन दिवसांतच मणिपूरला पूर्ववत स्थितीत आणतील. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना मणिपूरमधील आग शमवायची नसून ती कशी वाढेल यातच रस आहे, अशा तीव्र शब्दात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपवर हल्लाबोल केला.

Rahul Gandhi
Amol Mitkari on BJP : मी फक्त सामान्य अकोलेकरांची भावना बोलून दाखवली, त्यात एवढे चिडायचे काय कारण?

संसदेत विरोधकांनी मणिपूरमधील हिंसाचारावरून अविश्वासाचा ठराव आणला होता. यावर तीन दिवसांच्या चर्चेनंतर गुरुवारी पंतप्रधान मोदींनी सुमारे अडीच तासाच्या भाषणात उत्तर दिले. यावेळी पहिल्या तासाभरात मोदी मूळ मुद्दा असलेल्या मणिपूरवर एकही शब्द काढला नसल्याने विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांच्या 'वॉकआउट'नंतर मोदींनी मणिपूरच्या मूळ विषयला हात घातला तोही काही मिनिटेच, असे सागंत गांधींनी मोदींच्या संसदेतील भाषणाचा समाचार घेतला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com