Rashtrapati Bhawan : पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी तर तब्बल ३० खासदारांनी रविवारी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचाही समावेश आहे. ते बिहारमधील गया लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
मांझी यांच्या हिंदुस्तान आवाम मोर्चा या पक्षाचे ते एकमेव खासदार आहेत. त्यानंतरही त्यांना मोदींच्या कॅबिनेटमध्ये संधी मिळाली आहे. त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेत आपली ताकद दाखवून दिली आहे. मात्र, दुसरीकडे एक खासदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) देण्यात आले होते. ही ऑफर पक्षाने धुडकावून लावली आहे.
मांझी यांच्याबाबतीत केलेला न्याय राष्ट्रवादीबाबतीत का केला नाही, अशा चर्चांना आता उधाण आले आहे. निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे हे एकमेव विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीने कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, या विश्वासाने प्रफुल पटेल यांचे नाव निश्चित केले होते. पण प्रत्यक्षात त्यांना राज्यमंत्रिपदाची ऑफर आली. ही ऑफर नाकारत मंत्रिमंडळाच्या विस्ताराची वाट पाहण्याची तयारी राष्ट्रवादीने दर्शवली आहे.
पटेल हे युपीए सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्री होते. त्यामुळे राज्यमंत्री म्हणून काम करण्यास त्यांची तयारी नाही. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जावे लागले. पण त्यांची मनधरणी कामी आली नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनीही याला दुजोरा दिला. कॅबिनेट मंत्रिपदच हवे, या भूमिकेवर अजितदादाही ठाम आहेत. त्यामुळे रविवारी शपथविधीमध्ये राष्ट्रवादीला स्थान मिळाले नाही.
दरम्यान, जीतनराम मांझी हे बिहारचे माझी मुख्यमंत्री असून ते ज्येष्ठ नेतेही आहेत. बिहारमधील एक दलित चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मंत्रिमंडळातील जातीय गणिते, राज्यांना मिळणारे प्रतिनिधित्व, ज्येष्ठता आणि महत्वाचे म्हणजे बिहारमधील राजकीय स्थिती आदी कारणांमुळे मंत्रिमंडळामध्ये मांझी यांना संधी देण्यात आली असावी. यामध्ये पटेल मागे पडल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.