Praful Patel News : राष्ट्रवादी कॅबिनेट मंत्रिपदावर ठाम; प्रफुल पटेल यांनी सांगितले 'हे' कारण

Narendra Modi swearing in ceremony : माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या शपथविधी आधीच प्रसार माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडली. सुरुवातीला भाजपकडून राष्ट्रवादीला एक मंत्रिपदाची ऑफर दिली होती.
Praful Patel, Ajit Pawar
Praful Patel, Ajit PawarSarkarnama

Modi cabinet 2024 : देशात सलग तिसऱ्यांदा सत्तेचा सोपान राखण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी झाले आहेत. रविवारी सायंकाळी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या एनडीए सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला संधी मिळालेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पदरी निराशा आली आहे. रविवारी सायंकाळपर्यंत त्यांना फोन आला नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस कॅबिनेट मंत्रीपदावर ठाम असल्याचे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले.

माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या शपथविधी आधीच प्रसार माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडली. सुरुवातीला भाजपकडून राष्ट्रवादीला एक मंत्रिपदाची ऑफर दिली होती. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे पद मिळणार होते. (Narendra Modi swearing in ceremony News)

Praful Patel, Ajit Pawar
MP Murlidhar Mohol News : मंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी मुरलीअण्णांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले हा पुणेकरांचा सन्मान !

यापूर्वी केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद आमच्यकडे होते. त्यामुळे आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद दिले जावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) कॅबिनेट मंत्रीपदावर ठाम असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

भविष्यात मंत्रिमंडळात विस्तार होईल, तेव्हा निश्चितपणे भाजपकडून विचार होईल. आताही त्यांच्यकडून समावेशाचा प्रयत्न केला गेला. त्यांना आमच्याकडून कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती. त्यामुळे आम्हाला पुढच्यावेळेस मंत्रिपद दिले तरी चालेल पण आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद हवे, असेही यावेळी पटेल यांनी सांगितले.

दरम्यान, रविवारी मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी पटेल किंवा सुनील तटकरे (Sunil Tatkare) या दोघांनाही फोन न आल्याने तर्कवितर्क लढवले जात होते. त्यातच फडणवीस सकाळी तटकरे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले होते. यावेळी अजित पवार व इतर नेतेही उपस्थित होते.

त्यामुळे पडद्यामागे नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी घडत आहेत, याबाबत प्रचंड उत्सुकता होती. अखेर फडणवीसांनी काही तासांनी याबाबत उलगडा केला. त्यानुसार पटेल किंवा तटकरे रविवारी शपथ घेणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराची वाट पाहवी लागणार आहे.

Praful Patel, Ajit Pawar
Sandipan Bhumre : 'मी नाराज नाही, खासदार झालो यातच मला समाधान' ; मंत्रीपद हुकल्यानंतर भुमरेंचं विधान!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com