Narendra Modi |PM Narendra Modi News Updates | Latest Political News updates
Narendra Modi |PM Narendra Modi News Updates | Latest Political News updates sarkarnama
देश

विरोधकांना धडकी भरवणारे मोदींचे विधान : 2024 चा निकाल आजच लागलाय

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने (BJP) चार राज्यांत दणदणीत विजय मिळवला आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणीपूरध्ये भाजप सरकार स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. (PM Narendra Modi News Updates)

चार राज्यात भाजपचा विजयोत्सव, गुलाल उधळत पक्षाच्या दिल्लीतील कार्यालयात साजरा करण्यात आला. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 च्या निवडणुकीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे, असा दावा करत विरोधकांना धडक भरवली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), नितीन गडकरी (Nitin Gadkari), राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. मोदी म्हणाले, उत्तर प्रदेशातील 403 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजप २७० जागांवर आघाडीवर आहे. तर समाजवादी पक्षाला १२७ उमेदवारांना आघाडी मिळाली आहे. काँग्रेस व बसपाचा सुफडा साफ झाला असून दोन्ही पक्षांना अनुक्रमे दोन व एका जागेवर आघाडी आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा 2017 च्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीच लागला होता, असे अनेक पंडित तेव्हा म्हणाले होता. आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा निकालही 2022 च्या विधआनसभा निवडणुकीत निश्चित झाला आहे, असे त्यांना आता म्हणावे लागेल.

निकालाचा आजचा हा दिवस उत्सवाचा आहे. तरुणांनी भाजपला मोठ्या प्रमाणात मतदान केले. उत्तर प्रदेशने देशाला अनेक पंतप्रधान दिले. ३७ वर्षानंतर उत्तर प्रदेशात इतिहास घडला आहे. एक मुख्यमंत्री पुन्हा सत्तेत आले आहेत. भाजपच्या मतदानाचा टक्का वाढला आहे. गोव्याचे सगळे एक्झिट पोल चुकीचे निघाले. १० वर्ष सत्तेत राहूनही भाजपच्या जागा वाढल्या आहे. उत्तराखंडमध्येही भाजपने इतिहास घडवला, असे मोदी यांनी सांगितले. भाजपला चारही दिशांमधून आशीर्वाद मिळाला आहे.

लोकांनी भाजपवर विश्वास टाकला आहे. सामान्य सुविधांसाठी नागरिकांना सरकारी कार्यालयामध्ये चकरा माराव्या लागत होत्या. देशात गरीबांच्या नावावर खुप योजना झाल्या. मात्र, त्यांची अमंलबजावणी झाली नव्हती. मी मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे सामान्य लोकांसाठी कसे काम करावे लागते, याची मला माहिती होती. त्यामुळे गेल्या सात वर्षांत गरिबांच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचू लागल्या. त्यामुळे त्यांनी आपल्याला भरभरून आशिर्वाद दिले.

भ्रष्टाचाऱ्यांच्या लढाईत भाजप अग्रेसर राहणार आहे. अशा व्यक्तींविरुद्ध कारवाई केली की जातियवाद किंवा प्रादेशिकवादाच्या नावाखाली तिस विरोध केला जातो. मात्र अशा भ्रष्टाचाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल. घराणेशाहीला मतदारांनी नाकारले, हा पण या निकालाचा मोठा अर्थ आहे. भारताच्या लोकशाहीसाठी ते आवश्यक आहे. पुढील काळात अशा घराणेशाहीच्या राजकारणाला जनता हद्दपार केल्याशिवया राहणार नाही, याचा मला विश्वास आहे. माझे हे शब्द तुम्ही नोंद करून ठेवा, अशा वाक्यांत मोदींनी याविषयाची बाजू मांडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT