GST Revenue update : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित करताना उद्यापासून देशात जीएसटी बचत उत्सव सुरू होणार असल्याचे सांगितले. तसेच मागील वर्षभरात प्राप्तीकरातून सूट आणि जीएसटीतील सुधारणा अशा निर्णयांमुळे देशातील जनतेचे अडीच कोटी वाचणार असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. त्यांच्या या विधानावर काँग्रेसने जोरदार पलटवार केला आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हे स्वत: मैदानात उतरले. त्यांनी सोशल मीडियातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. 2017 पासून जीएसटीच्या माध्यमातून सरकारने तब्बल 55 लाख कोटी रुपयांची वसुली केल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे सरकारने उलट जनतेची माफी मागायला हवी, असेही ते म्हणाले आहेत.
काय म्हणाले खर्गे?
मल्लिकार्जून खर्गे यांनी सोशल मीडियात पोस्ट करत मोदींवर टीका केली आहे. नौ सौ चूहे खाकर, बिल्ली हज को चली!, असे म्हणत त्यांनी मोदींनी उद्देशून म्हटले आहे की, तुमच्या सरकारने काँग्रेसच्या सोप्या आणि कुशल जीएसटीऐवजी वेगवेगळ्या नऊ स्लॅबचा गब्बर सिंह ट्रक्स लावला आणि 8 वर्षांत 55 लाख कोटींहून अधिक वसुली केली.
आता तुम्ही अडीच लाख कोटींच्या बचत उत्सवावर बोलत आहात. जनतेला खोलवर जखमा देऊन तात्पुरते बँडएड लावण्याच्या गप्पा मारत आहात. तुम्ही डाळ, तांदूळ, धान्य, पेन्सिल, पुस्तके, उपचार, शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर या सगळ्यांतून जीएसटी वसूल केला होता, हे जनता कधीच विसरणार नाही. तुमच्या सरकारने तर जनतेची माफी मागायला हवी, अशी टीका खर्गे यांनी केली आहे.
मोदी काय-काय म्हणाले?
- नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सुर्योदयासोबतच नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणा लागू होणार आहे. देशात जीएसटी बचत उत्सवाला सुरूवात.
- या उत्सवात तुमची बचत वाढून तुम्ही तुमच्या पसंतीच्या वस्तू अधिक खरेदी करू शकता.
- आपल्या देशातील गरीब, मध्यवर्गीय लोक, युवक, शेतकरी, महिला, दुकानदार, व्यापारी, उद्योजक या सर्वांना या उत्सवाचा खूप फायदा होईल.
- उत्सवांमध्ये प्रत्येकाचे तोंड गोड होणार आहे. कुटुंबामधील आनंद वाढणार आहे. ही बचत देशाच्या विकासाचा वेग वाढवेल.
- जीएसटी सुधारणांमुळे रोजच्या जगण्यातील अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. बहुतेक वस्तू टॅक्स फ्री होतील. जवळपास 99 टक्के वस्तूंवर पाच टक्के किंवा टॅक्स फ्री असतील.
- प्राप्तीकरातील सूट आणि जीएसटी सुधारणा हे एकत्रित केले तर मागील एक वर्षांत घेतलेल्या निर्णयांमुळे देशातील जनतेची अडीच लाख कोटी रुपयांहून अधिक बचत होईल. त्यामुळे हा बचत उत्सव असल्याचे मी म्हणत आहे.
- आत्मनिर्भर भारतासाठी हे एक मोठे पाऊल आहे. देशातील सर्व घटकांना याचा फायदा होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.