
थोडक्यात महत्वाचे :
राहुल गांधींना तीन दिवसांत तरुणाईकडून दुसरा मोठा धक्का बसला, दिल्ली विद्यापीठानंतर हैद्राबाद सेंट्रल यूनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी निवडणुकीतही काँग्रेसच्या एनएसयूआयचा पराभव झाला.
तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता असूनही, एबीव्हीपीने अध्यक्ष, उपाध्यक्ष, महासचिव यांसह बहुतेक पदांवर दणदणीत विजय मिळवला.
एबीव्हीपीने हा विजय राष्ट्रवादाला समर्थन आणि विभाजनकारी राजकारणाला नाकारण्याची निशाणी असल्याचे सांगितले, तर काँग्रेस आणि डाव्या पक्षांसाठी हा पराभव मोठा धक्का मानला जातो.
NSUI Suffers Major Setback in Student Union Polls : काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून मोदी सरकारविरोधात सातत्याने तरूणाईला साद घातली जाते. बेरोजगारी, शिक्षण व नोकरीतील आरक्षण अशा मुद्द्यांवरून ते तरूणांची मने जिंकण्याचा प्रयत्न करत असतात. पण मागील तीन दिवसांत याच तरूणाईने त्यांना धक्का दिला आहे.
दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत काँग्रेसशी संलग्न ‘एनएसयूआय’ या विद्यार्थी संघटनेचा पराभव झाला. त्यानंतर काही तासांतच काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यातही या संघटनेचा सुपडा साफ झाला आहे. हैद्राबाद सेंट्रल यूनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दणदणीत विजय मिळवला आहे.
विशेष म्हणजे तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता आहे. असे असतानाही एनएसयूआयला दारूण पराभवाचा सामना करावा लागल्याने काँग्रेसला धक्का बसला आहे. संघटनेच्या उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते मिळाल्याने हा पराभव मानहानीकारक ठरला आहे. मागील सहा वर्षे एनएसयूआय आणि डाव्या पक्षांशी संबंधित विद्यार्थी संघटनांचा या निवडमुकीत वरचष्मा असायचा. यावेळी मात्र एबीव्हीपीने चमत्कार घडवला आहे.
एबीव्हीपीच्या उमेदवारांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष, महासचिव, संयुक्त सचिव क्रिडा सचिव, सांस्कृतिक सचिव या महत्वाच्या पदांसह इतर बहुतेक पदांवर बाजी मारली आहे. हा विजय म्हणजे विद्यार्थ्यांचे राष्ट्रवादाला समर्थन आणि विभाजनकारी राजकारणाला नाकारण्याची निशाणी असल्याची प्रतिक्रिया एबीव्हीपीकडून देण्यात आली आहे.
एबीव्हीपीने हा विजय ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. विद्यापीठाच्या परिसरात शांततात, विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण आणि विद्यापीठाच्या जमीनच्या सुरक्षेसाठी केलेल्या प्रयत्नांचा हा परिणाम असल्याचे संघटनेचे कार्यकर्ते सांगत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस आणि डाव्या पक्षांसाठी हा मोठा झटका आहे. तीन दिवसांत दोन महत्वाच्या विद्यापीठांमध्ये तरूणाईने काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या विचारांच्या संघटनांना नाकारल्याचे निकाल समोर आले आहेत.
Q1: कोणत्या विद्यापीठात एनएसयूआयचा पराभव झाला?
A: हैद्राबाद सेंट्रल यूनिव्हर्सिटीमध्ये.
Q2: या निवडणुकीत कोणत्या संघटनेने विजय मिळवला?
A: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी).
Q3: काँग्रेससाठी हा पराभव महत्वाचा का ठरला?
A: कारण तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता असूनही त्यांच्या विद्यार्थी संघटनेला मोठा धक्का बसला.
Q4: एबीव्हीपीने विजयाचे श्रेय कशाला दिले?
A: राष्ट्रवादाला समर्थन, विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण आणि शांततामय प्रयत्नांना.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.