PM Narendra Modi, Shashi Tharoor Sarkarnama
देश

PM Narendra Modi : आज अनेकांची झोप उडणार..! मोदींनी दिले मोठे संकेत, थरूर यांच्याशी ‘शेक हँड’ अन् काँग्रेसवर निशाणा...

PM Narendra Modi and Shashi Tharoor’s Unexpected Handshake : शशी थरूर हे काँग्रेस सोडणार असल्याची जोरदार चर्चा मागील काही दिवसांपासून आहे. त्यातच आज ते पंतप्रधान मोदींसोबत व्यासपीठावरही दिसून आले.

Rajanand More

PM Narendra Modi in Kerala : भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणाव वाढलेला असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशभरातील विकासकामांचा धडाका सुरूच ठेवला आहे. शुक्रवारी त्यांनी केरळात एका आंतरराष्ट्रीय बंदराचे लोकार्पण केले. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आणि काँग्रेसचे खासदार शशी थरूर हेही होते.

शशी थरूर हे काँग्रेस सोडणार असल्याची जोरदार चर्चा मागील काही दिवसांपासून आहे. त्यातच आज ते पंतप्रधान मोदींसोबत व्यासपीठावरही दिसून आले. विशेष म्हणजे पंतप्रधान व्यासपीठावर आल्यानंतर त्यांनी इतर नेते आणि मंत्र्यांना हात जोडून नमस्कार केला. पण मोदींनी थरूर यांच्या हातात हात मिळवला. व्यासपीठावर केवळ शरूर यांच्यासोबत त्यांनी हात मिळवल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

पंतप्रधान मोदी एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी आपल्या भाषणातही सूचक विधान केले. ते म्हणाले, ‘मी मुख्यमंत्री पिनारई विजयन यांना सांगू इच्छितो की, तुम्ही इंडिया ब्लॉकचे मजबूत स्तंभ आहात. शशी थरूरही इथे बसले आहेत. आजच्या कार्यक्रमामुळे अनेक लोकांची झोप उडणार आहे. ही गोष्ट जिथे पोहचायची, तिथे पोहचलीही असेल,’ असे म्हणत मोदींनी एकप्रकारे इंडिया आघाडीला इशारा दिला आहे.

पंतप्रधानांनी लोकार्पण केलेले बंदर थरूर यांच्या तिरुवनंतपुरम मतदारसंघातील आहे. हे बंदराची भारताचा व्यापार आणि शिपिंगमध्ये मोठी भूमिका असणार आहे. दरम्यान, शरूर हे गुरूवारी रात्री तिरुवनंतपुरम विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतालाही उपस्थित होते. त्यानंतर आज त्यांनी या कार्यक्रमालाही हजेरी लावल्याने तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

शशी थरूर यांची ही कृती आणि पंतप्रधान मोदींचे आजच्या विधानाची परस्पर सांगड घातली जाऊ लागली आहे. सोशल मीडियात त्यावरून चर्चांना उधाण आले आहे. थरूर भाजपमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट झाल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान मोदींनी आज अनेकांची झोप उडणार असल्याचे विधान करत थरूर यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिल्याचीही चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT