PoK emergency signs : पाकव्याप्त काश्मीरमध्ये खळबळ; भारताच्या भीतीने पंतप्रधानांकडून आणीबाणीबाबत मोठी घोषणा

Madrasas and Tourism Being Shut Down in PoK : पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे यापूर्वी अनेकदा सिध्द झाले आहे.
POK
POKSarkarnama
Published on
Updated on

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर भीतीचे सावट आहे. भारत कोणत्याही क्षणी हल्ला करण्याची शक्यता असल्याची चर्चा पाकिस्तानात आहे. प्रामुख्याने दहशतवाद्यांचा ठावठिकाणा असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान चौधरी अनवर-उल-हक यांनी गुरूवारी आणीबाणीचे संकेत देणारी मोठी घोषणा केली आहे.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे यापूर्वी अनेकदा सिध्द झाले आहे. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकप्रमाणे भारताकडून पुन्हा एकदा मोठा हल्ला होण्याची भीती पाकिस्तानला आहे. त्यादृष्टीने या भागात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे. सध्याची सुरक्षेची स्थिती पाहून एलओसी परिसरातील संवेदशनशील भागात पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

POK
Political Strike : पाकिस्तानवर हल्ल्याआधीच मोदींकडून भारतातच ‘पॉलिटिकल स्ट्राईक’

धार्मिक मदरसे पुढील दहा दिवस बंद करण्याचे आदेशही येथील प्रशासनाला देण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण जाले आहे. पीओके सरकारने दावा केला आहे की, भारताची आक्रमकता पाहून खाद्यान्न, औषधे तसेच इतर गरजेच्या वस्तूंचा पुरेसा साठा करण्यासाठी तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. आपत्कालीन फंडामध्ये एक अब्ज रुपये जमा करण्यात आले आहेत. हॉटेल, गेस्टहाऊस आदींनी त्यांची संपत्ती लष्कराला देण्याची तयारी दर्शवल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.

पीओकेतील अधिकाऱ्यांनी गुरूवारी एलओसी परिसरात पर्यटकांना बंदी घातली आहे. आलेल्या पर्यटकांना परत पाठविले जात आहे. परिसरातील नागरिकांना एलओसीजवळ जाण्यासही मनाई करण्यात आली आहे. तसेच लष्कराला मदत करण्याचे आवाहनही सरकारकडून करण्यात आले आहे. भारत मदरशांना दहशतवादी प्रशिक्षण केंद्र समजून तिथे हल्ला करण्याची शक्यता असल्याने ते दहा दिवस बंद ठेवले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

POK
Jagdeep Dhankhar News : 'सुप्रीम' नाराजीनंतरही धनखड यांचा पुन्हा प्रहार; यावेळी शपथच काढली...

आपण एका चलाख, क्रुर आणि षडयंत्रकारी शत्रूशी लढत आहोत. त्यांच्याकडून कोणतीही नीच कृती केली जाऊ शकते, अशा शब्दांत कायदामंत्री अब्दुल वाहिद यांनी भारतावर आगपाखड केली आहे. दरम्यान, पाकिस्तानमधील गिलगित-बाल्टिस्तानमधील हवाई क्षेत्र काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आले आहे. कराची आणि लाहोर, इस्लामाबाद या शहरांना वाचविण्यासाठी पाक सरकारकडून आपत्कालीन उपाययोजना केल्या जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com