Narendra Modi  Sarkarnama
देश

Narendra Modi Speech In White House : '' तीन दशकांपूर्वी सामान्य नागरिक म्हणून अमेरिका दौऱ्यावर आलो होतो; तेव्हा...''

सरकारनामा ब्यूरो

Narendra Modi News : '' तीन दशकांपूर्वी एक सामान्य नागरिक म्हणून मी अमेरिका दौऱ्यावर आलो होतो. तेव्हा मी व्हाईट हाऊसला बाहेरून बघितलं होतं. पंतप्रधान बनल्यानंतर मी स्वत: इथे अनेकदा आलो आहे असा आठवणींचा पट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उलगडला. यावेळी त्यांनी एवढ्या मोठ्या संख्येनं भारतीय-अमेरिकन समुदायासाठी व्हाईट हाऊसचे दरवाजे आज पहिल्यांदाच उघडले असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याविषयी कौतुकाचा वर्षाव केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेत पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी व्हाईट हाऊसच्या दक्षिण लॉनमध्ये १९ तोफांची सलामी आणि राष्ट्रगीत वाजवून पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यात आले. यावेळी बायडेन म्हणाले, जगाची परिस्थिती पाहता भारत(India)-अमेरिका एकत्र काम करणे आवश्यक आहे.

मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन(Joe Biden) यांचं निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसला भेट दिली. यावेळी केलेल्या भाषणा दरम्यान त्यांनी उपस्थित भारतीय व अमेरिकेकन नागरिकांची मनं जिंकली.

मोदी म्हणाले, "भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध लोकशाही मूल्यांवर आधारित आहेत. दोन्ही देशांच्या संविधानाची सुरुवात 'आम्ही लोक' या शब्दांनी होते. दोन्ही राष्ट्रांना आमच्या विविधतेचा अभिमान वाटतो. कोविड-नंतरच्या युगात, जागतिक व्यवस्था नवीन आकार घेत आहे. जागतिक भल्यासाठी, जागतिक शांतता आणि स्थिरतेसाठी, आम्ही एकत्र काम करण्यास कटिबद्ध आहोत असंही मोदी यांनी यावेळी म्हणाले.

भारत आणि अमेरिका H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल जाहीर करणार आहेत आणि नवीन वाणिज्य दूतावास उघडणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. काही टक्के कामगार भारतात परत न येता अमेरिकेत त्यांच्या H-1B व्हिसाचे नूतनीकरण करू शकतील. अमेरिकेतील सहावे भारतीय वाणिज्य दूतावास सिएटलमध्ये सुरू होईल आणि अलास्का देखील कव्हर करेल.

मंगळावर आणि त्यापलीकडे अंतराळ संशोधनाचा विस्तार करण्याच्या अंतिम उद्दिष्टासह २०२५ पर्यंत पुन्हा चंद्रावर मानव पाठविण्याच्या अमेरिकेच्या नेतृत्वाखालील प्रयत्न, आर्टेमिस अॅकॉर्ड्समध्ये भारत देखील सहभागी होणार आहे.

मोदी- बायडेन यांच्या भेटीमध्ये संरक्षण सहकार्यापासून ते अंतराळ मोहिमेपर्यंतच्या अनेक मोठ्या-मोठ्या घोषणा करण्यात आल्या. ज्यामुळे दोन्ही राष्ट्रांमधील संबंध अधिक दृढ होतील अशी अपेक्षा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, व्हिसाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे आणि दोन्ही देश अतिरिक्त वाणिज्य दूतावास उघडतील असा निर्णय घेण्यात आला आहे या घोषणांचा समावेश आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT