Uday Samant On Ajit Pawar: अजितदादांची विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी ; सामंतांनी सांगितलं 'हे' कारण

Pimpri Chinchwad Political News : '' एनसीपी ही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते घेण्याच्या विचारात आहे...''
Uday Samant, Ajit Pawar
Uday Samant, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad : विधानसभेतील विरोधीपक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्षसंघटनेचे काम द्या अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी बुधवारी (दि.२१) राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्तच्या मेळाव्यात मुंबईत केली. या विधानाचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. अजितदादांच्या त्या विनंतीवर शिवसेने (शिंदे गट)चे नेते व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत(Uday Samant) यांनी गुरुवारी( दि.२२) पिंपरीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. सामंत म्हणाले, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका करीत असताना दुसरीकडे पंडीत नेहरू आणि इंदिरा गांधीनंतर नरेंद्र मोदी हे देशाला लाभलेले कर्तृत्ववान पंतप्रधान आहेत, असे अजित(Ajit Pawar)दादा म्हणत आहेत. याचा अर्थ महाविकास आघाडीची वज्रमूठ आवळलेली नसल्याचाच प्रकार आहे. त्यातूनच अजितदादांनी सदर विधान केलेल असावे, असे सामंत म्हणाले.

Uday Samant, Ajit Pawar
Ajit Pawar News : राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार! अजित पवार प्रदेशाध्यक्ष तर जयंत पाटलांकडे जाणार 'हे' पद?

उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड(Pimpri Chinchwad)मधून वाहणाऱ्या इंद्रायणी व पवना नदीच्या जलप्रदुषणावर नियंत्रणात्मक उपाययोजना करण्याबाबत त्यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेत झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी अजितदादा यांना विरोधी पक्षनेता म्हणून काय त्रास होत आहे. हे त्यांनाच विचारा असा उलटा प्रश्न त्यांनी केला.

तसेच ते भाजपच्या वाटेवर आहेत का असे विचारले असता ते भाजपला ठरवायचे आहे असं म्हटलं. याचवेळी त्यांनी मात्र एक नक्की आहे की, एनसीपी ही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते घेण्याच्या विचारात आहे असे सांगत त्यांनी आघाडीत वादाची ठिणगी टाकण्याचा प्रयत्न केला.

Uday Samant, Ajit Pawar
Sudhir Mungantiwar News : एबी फॉर्मवर प्रदेशाध्यक्षाची सही असते, विरोधी पक्षनेत्याची नाही; मुनगंटीवारांनी अजित पवारांना डिवचले !

नदी स्वच्छतेसाठी दीड हजार कोटी रुपये खर्च येणार

पिंपरी-चिंचवडमधून वाहणाऱ्या व एमआय़डीसीतील रसासनमिश्रीत पाणी आणि पिंपरी-चिंचवडमधील सांडपाण्यामुळे गटारगंगा झालेल्या इंद्रायणी व पवना नदीच्या स्वच्छतेसाठी दीड हजार कोटी रुपये खर्च येणार असून या कामाची निविदा ऑक्टोबरमध्ये काढण्यात येईल,असे सामंत यांनी यावेळी सांगितले. या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तातडीने बनविण्याचा आदेशही त्यांनी दिला.दोन वर्षात हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिका आयुक्त अनुक्रमे शेखरसिंह आणि विक्रमकुमार, पुणे जिल्हा परिषद आणि एमआयडीसीचे सीईओ अनुक्रमे आयुष प्रसाद आणि बिपीन शर्मा,पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल,पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे आदी या उपस्थित होते.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com