Nitin Gadkari  sarkarnama
देश

Nitin Gadkari : 'मै नितीन जयराम गडकरी...', सलग तिसऱ्यांदा घेतली मंत्रिपदाची शपथ

Roshan More

Nitin Gadkari News : मै नितीन जयराम गडकरी, ईश्वर की शपथ लेता हूं की...अशी धीरगंभीर स्वरात नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) संध्याकाळी साडेसात वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंह, अमित शाह यांच्या नंतर चौथ्या क्रमांकवर नितीन गडकरी यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली .

नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले. 2014 मध्ये प्रथमच नागपूर लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले. मोदींच्या मंत्रिमंडळात बाकीच्या मंत्र्‍यांच्या कामगिरीपेक्षा नितीन गडकर यांची कामगिरी नेहमीच उजवी ठरली आहे. 2014 मध्ये नितीन गडकरी यांना मोदी यांनी मंत्रिमंडळात रस्ते विकास खात्याचे मंत्री होते.

2019 मध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा नितीन गडकरी लोकसभेत पोहचले. मोदी -2 मध्ये देखील मंत्रिमंडळात होते. त्यांच्या आवडीच्या रस्ते विकास व दळणवळण मंत्रालयाचे मंत्रिपद त्यांचेकडे होते. 2024 मध्ये विजयाची हॅटट्रिक करत नितीन गडकरी लोकसभेत पोहचले आहेत.

2024 मध्ये नितीन गडकरींनी काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांचा पराभव केला. गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत ही निवडणूक त्यांना कठीण केली. कारण पाच लाखांच्या लीडचा दावा करणाऱ्या गडकरींना 1 लाख 37 हजारच्या लीडने विजयी झाले. त्यांनी मंत्रि‍पदाचे शपथ घेतली असली तरी त्यांना त्यांच्या आवडीचे रस्ते विकास व दळणवळ खाते मिळणार का? याची उत्सुकता असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT