Piyush Goyal Sarkarnama
देश

Piyush Goyal Oath : 'मै पीयूष वेदप्रकाश गोयल...'; सलग तिसऱ्यांदा घेतली मंत्रिपदाची शपथ

PM Narendra Modi oath ceremony : नरेंद्र मोदी यांनी रविवारी संध्याकाळी सव्वासात वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातून सहा जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

Sachin Waghmare

Piyush Goyal Oath : मै पीयूष वेदप्रकाश गोयल, ईश्वर की शपथ लेता हूं की...अशा स्वरात पीयूष गोयल यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांनी रविवारी संध्याकाळी सव्वासात वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंह, अमित शाह यांच्यानंतर दहाव्या क्रमांकवर पीयूष गोयल यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित भव्य समारंभात नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ दिली.

लोकसभा निवडणुकीत त्यांनी मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून राज्यातील सर्वाधिक मतांची आघाडी घेत विजय मिळवला होता. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे भूषण पाटील यांचा पराभव केला होता. या नंतर पियुष गोयल यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. रविवारी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

पीयूष वेदप्रकाश गोयल (Piyush Goyal) यांनी यापूर्वी 2019 च्या मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे. त्यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्री आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री या खात्यांचा त्यांच्याकडे पदभार होता. त्यानंतर 3 सप्टेंबर 2017 रोजी त्यांची कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली होती.

यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाचे (Bjp) राष्ट्रीय कोषाध्यक्षपद भूषवले होते. 2014च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी सोशल मीडिया पोहोचण्यासह पक्षाच्या प्रचार आणि जाहिरात मोहिमेचे निरीक्षण केले.

गोयल यांनी 2018 आणि 2019 मध्ये दोनदा वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला आहे. यापूर्वी ते 2014-2017 मध्ये ऊर्जा, कोळसा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री होते तर 2016-17 मध्ये राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार होते.

SCROLL FOR NEXT