New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 24 सप्टेंबर रोजी त्यांच्या 'मन की बात' कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या 'मन की बात' या कार्यकमाच्या शंभर भागांचा म्हणजचे शतकाचा टप्पा पूर्ण झाला असून, आज 105 वा भाग प्रसारित होणार आहे. (Latest Marathi News)
'मन की बात' या कार्यक्रमाच्या आजच्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला आरक्षण विधेयकावर चर्चा करू शकतात. यापूर्वी, 27 ऑगस्ट रोजी प्रसारित झालेल्या 104 व्या भागामध्ये, पंतप्रधानांनी चांद्रयान 3, G-20 बैठक, जागतिक खेळ विद्यापीठ, पर्यटन, दुग्ध उद्योग आणि हर घर तिरंगा मोहिमेच्या यशाबद्दल त्यांनी भाष्य केले होते.
महिला आरक्षण विधेयक हे भारतासाठी किती महत्त्वाचे आहे, याच्या पूर्ततेसाठी बोलावलेले विशेष अधिवेशन, तीन दशकांपासून रखडलेल्या या विधेयकासंदर्भात पंतप्रधान मोदी नेमके काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.