PM Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने आज (३१ मे) राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क अभियानाची सुरुवात होणार आहे. राजस्थानमधील अजमेर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका रॅलीने आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमधून भाजपच्या जनसंपर्क अभियानाची सुरुवात होणार आहे.
अजमेरला जाण्यापूर्वी पंतप्रधान पुष्करमधील ब्रह्मा मंदिरालाही भेट देण्याची शक्यता आहे. राज्यात काँग्रेसचे (Congress) मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील नेतृत्वाचा संघर्ष सुरू असताना भाजपने आपल्या महत्त्वपूर्ण प्रचारासाठी राजस्थानची (Rajasthan) निवड केली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली होणार आहे.
आता पुढील 30 दिवसांत भाजपचे ज्येष्ठ नेते देशभरातील 51 रॅलींना संबोधित करतील. लोकसभेच्या स्तरावर एकूण 500 जाहीर सभांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
पक्षाचे सदस्य देशभरातील पाच लाखांहून अधिक कुटुंबांशी संपर्क साधतील साधणार आहेत. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सुमारे 1, 000 कुटुंबापर्यंत भाजप (BJP) पोहचणार आहे. पक्षाने 543 लोकसभा मतदारसंघांची 144 क्लस्टरमध्ये विभागणी केली आहे, प्रत्येक क्लस्टरमध्ये किमान तीन चार मतदारसंघ येतील. मंत्र्यांसह पक्षाचे दोन वरिष्ठ नेते प्रत्येक क्लस्टरमध्ये आठ दिवस असणार आहेत. त्यामध्ये समाजातील विविध घटकांसह अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
हे नेते सरकारचे रिपोर्ट कार्ड आणि गरीब कल्याणाचा अहवालही जनतेसमोर मांडणार आहेत. नरेंद्र मोदींनी 26 मे 2014 रोजी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि दुसऱ्या टर्ममध्ये त्यांनी 30 मे 2019 रोजी शपथ घेतली होती. मोदी सरकारच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम या नेत्यांच्या माध्यमातून होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.