नाशिक : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे (Akhada parishad) अध्यक्ष (President) महंत नरेंद्रगिरी (Narendragiri) यांचा मृतदेह (Deadbody) काल सायंकाळी संशयास्पद (Suspected) स्थितीत आढळला. त्यांच्या भक्तांना (Followers) ती हत्या (Murder) वाटतेय. उत्तर प्रदेशातच हिंदुत्वाचा (Hindutwa) गळा घोटला गेलाय, असे प्रतिपादन शिवसेना (Shivsena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले.
महंत नरेंद्रगिरी यांच्या संशयास्पद स्थितीतील मृत्यूबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता ते बोलत होते. महंत नरेंद्रगिरी यांचा काल सायंकाळी त्यांच्या मठात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्याबाबत पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. ही आत्महत्या आहे. त्यांची आत्महत्या तणावात असल्याने झाल्याचे पोलिसांचे प्राथमिक मत आहे. त्याबाबत देशभरातील धार्मिक संस्थांमध्ये तणावाचे वातावरण आहे.
यासंदर्भात शिवसेना नेते राऊत म्हणाले, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी यांचे आशिर्वाद अनेकदा मिळाले आहेत. काल त्यांच्या मृत्यूच प्रकरण समोर आलय ते अत्यंत रहस्यमय वाटते. त्याला आत्महत्या म्हणत असाल तर त्यांच्या भक्तांना ती हत्या वाटतेय.
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात जेव्हा काही साधुंना मारल होत, तेव्हा देशभरात भारतीय जनता पक्षाने आवाज उठवला होता. आम्ही पालघरच्या घटनेची निपक्ष चौकशी केली. संबंधीतांवर तातडीने कोरवाई करून गुन्हा दाखल केला. आरोपपत्र दाखल केले. नरेंद्रगिरी प्रकरणात सीबीआय चौकशीची गरज आहे. आता उत्तरप्रदेशातच हिदुंत्वाचाच गळा घोटला गेलाय. याबाबत काय? असा प्रश्न त्यांनी केला.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.