आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरींचा संशयास्पद मृत्यू?

या घटनेने धार्मिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नरेंद्रगिरी हे साधूंचे राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व करीत होते.
Mahant Narendragiri No More
Mahant Narendragiri No Moresarkarnama
Published on
Updated on

नाशिक : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष, महंत नरेंद्रगिरी यांचे आज सायंकाळी निधन झाले. पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळले. त्यामुळे धार्मिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नरेंद्रगिरी हे साधूंचे राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व करीत होते.

नरेंद्रगिरी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. धार्मिक क्षेत्रात या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रीया उमटल्या. यासंदर्भात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष महंत ज्ञानदास महाराज यांचे उत्तराधिकारी संजयदास यांनी संवेदना व्यक्त करीत, ही घटना संशयास्पद आहे. श्री. नरेंद्रगिरी वयोवृद्ध असले तरीही ते असे काहीही करू शकत नाही. या घटनेवर आमचा विश्वास नाही. त्यामुळे या घटनेची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com