Sonai Gandhi, Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधात डॉक्टर्स आक्रमक; थेट सोनिया गांधींना पत्र, काय आहे प्रकरण?

Doctors protest Rahul Gandhi's remarks, demand action from Sonia Gandhi: नॅशनल मेडिकोज ऑर्गनायझेशन भारत या डॉक्टरांच्या संघटनेने सोनिया गांधींना पत्र लिहून राहुल गांधींची तक्रार केली आहे.

Rajanand More

New Delhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात डॉक्टरांची एक संघटना आक्रमक झाली आहे. राहुल यांनी माफी मागावी, यासाठी या संघटनेने त्यांच्या आई व काँग्रेस माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनाच पत्र लिहिले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याविषयी राहुल यांनी केलेल्या एका विधानावरून या संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.

नॅशनल मेडिकोज ऑर्गनायझेशन भारत संघटनेचे अध्यक्ष सी. बी. त्रिपाठी यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिले आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल यांनी जो बायडेन यांची मेमरी लॉस झाल्याचे विधान केले होते. बायडेन यांच्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेमरी लॉस झाली असावी, असे राहुल यांनी म्हटले होते.

त्रिपाठी यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात हे विधान अपमानजनक असल्याने राहुल यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. राहुल यांच्या विधानावरून समजते की त्यांच्यामध्ये संवेदनशीलता नाही. सार्वजनिक व्यासपीठावर अशी विधाने चुकीचा संदेश देतात. त्यामुळे आमची संघटना निराश झाल्याचे त्रिपाठी यांनी पत्रात म्हटले आहे.

एखाद्या विदेशी राष्ट्राध्यक्षांविषयी राहुल यांनी केलेली अशी अभद्र टिप्पणी पाहणे निराशाजनक आहे. बायडेन हे राहुल यांच्यापेक्षा वयाने मोठे आहेत. ज्येष्ठांचा सन्मान करण्याच्या आपल्या संस्कृतीच्या विपरित त्यांचे विधान आहे. विरोधी पक्षनेत्याने असे विधान करणे अशोभनीय आहे. त्यामुळे त्यांच्यात संवेदनशीलता नसल्याचे दिसते, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

काय म्हटले होते राहुल गांधींनी?

राहुल गांधींनी यांची अमरावती येथे 16 नोव्हेंबरला प्रचारसभा झाली होती. यावेळी त्यांनी मोदींवर टीका करताना जो बायडेन यांचे उदाहरण दिले होते. बायडेन यांच्या लक्षात काही गोष्टी राहत नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न राहुल यांनी केला होता. यावेळी त्यांनी बायडेन यांच्याप्रमाणेच नरेंद्र मोदींचाही मेमरी लॉस झाला असावा, असे म्हटले होते.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT