Rahul Gandhi : महाराष्ट्रासह अदानींची काँग्रेसच्या राज्यातही डील! राहुल गांधींनी वाढवलं नेत्यांचं टेन्शन

Gautam Adani Group Adani Green Energy Congress Narendra Modi : राहुल गांधी यांनी गुरूवारी गौतम अदानी यांच्या अटकेची मागणी केली आहे. त्यांना अटक झाली झाली तर सर्व भ्रष्टाचार बाहेर येईल, असा दावा त्यांनी केला आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरूवारी उद्योगपती गौतम अदानी यांना आजच अटक करण्याची मोठी मागणी केली आहे. अमेरिकेतील लाच आणि फसवणूक प्रकरणात अदानींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर राहुल यांनी भारतातील कॉन्ट्रॅक्ट आणि प्रकल्पांचीही चौकशी करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्येही अशी डील्स झाल्या आहेत.

तेलंगणासह कर्नाटक या काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये अदानींच्या कंपन्यांनी विविध प्रकल्पांसाठी कॉन्ट्रॅक्ट केले आहेत. त्यावरून भाजपने यापूर्वीही काँग्रेसवर निशाणा साधला होता. आता अमेरिकेती अदानींवर खटला दाखल करण्यात आल्यानंतर राहुल गांधींची टीकेची धार अधिकच टोकदार झाली आहे. गुरूवारी त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांचेही टेन्शन वाढवले.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : गौतम अदानींना आजच अटक करा! राहुल गांधींचा हल्लाबोल...

तेलंगणा, कर्नाटकमध्येही डील्स झाल्याबाबत विचारण्यात आल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, या प्रकरणात जो कुणी असेल त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. राजस्थान आणि महाराष्ट्र राज्याचाही यामध्ये सहभाग आहे. छत्तीसगडमध्ये असाच करार झाला आहे. कुणाचेही सरकार असले तरी त्यावर कारवाई हवी. मी दोन-तीन दिवसांपूर्वी स्पष्ट म्हटले आहे की, जिथे भ्रष्टाचार आहे, तिथे चौकशी व्हावी. पण त्याची सुरूवात अदानींपासून व्हावी. त्याशिवाय हे शक्य होणार नाही. शेवटी यामध्ये मोदींचे नाव येईल.

भारत अदानींच्या मुठीत आहे. अदानींना ज्यादिवशी मोदी अटक करतील, त्यादिवशी तेही जातील, असे राहुल गांधी म्हणाले.  राजकीय, प्रशासकीय आणि आर्थिक क्षेत्रातील लोकं या रॅकेटमध्ये आहेत. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये या रॅकेटने काम केले आहे. स्टॉकची किंमत जास्त ठेवून त्याआधारे कर्ज घ्यायचे, व्यवसाय करायचा, त्यातून सरकार बनवायचे, कामे मिळवायची, ही रचना असल्याचे राहुल यांनी सांगितले.

Rahul Gandhi
Gautam Adani : अमेरिकेत खटला दाखल होताच अदानींनी घेतला मोठा निर्णय; शेअर बाजारात भूकंप  

अदानी हे नियमानुसार प्रक्रिया करत असतील तर त्यावर आमचा काहीच आक्षेप नाही. पण भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी पध्दतीने ही कामे जिथे झाली असतील अशा सर्व राज्यांमध्ये चौकशी करावी. पण सुरूवात तर अदानींपासूनच होईल. त्यांना अटक केली तर सगळे समोर येईल. माधवी बूच अदानींच्या स्टॉकच्या किंमतींना संरक्षण देत आहेत. पण यामध्ये अदानींना काहीच होणार नाही, गुंतवणुकदार संपून जातील. देशाची सुरक्षा आणि विकासासाठी हे धोकादायक असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com