bv srinivas,  smriti irani
bv srinivas, smriti irani Sarkarnama
देश

BV Srinivas Defamation Notice: स्मृती ईराणींना 'डार्लिंग' म्हणणं काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या अंगलट; Video पाहा; डार्लिंग बना कर…

सरकारनामा ब्यूरो

BV Srinivas Vs Smriti Irani : मानहानी केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आपली खासदारकी गमावावी लागली आहे, हे प्रकरण ताजे असतानाच आणखी एका काँग्रेसच्या बड्या नेत्यावर मानहानी केल्याप्रकरणी भाजपने गुन्हा दाखल केला आहे. भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्याविषयी त्यांनी अवमानकारण विधान केले आहे.

युथ काँग्रेसचे राष्ट्रीय नेते बीवी श्रीनिवास यांच्याविरोधात भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ही तक्रार केली आहे. "श्रीनिवास यांनी माफी मागावी," असे मालवीय यांनी आपल्या नोटिशीत म्हटलं आहे.

मालवीय यांनी टि्वट करीत श्रीनिवास यांना नोटिस पाठवली आहे. यात केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याचा आरोप केला आहे. "ही व्यक्ती युथ काँग्रेसचे अध्यक्ष आहे," असे त्यांनी म्हटलं आहे. अमेठी लोकसभा मतदार संघात राहुल गांधी यांचा स्मृती ईराणी यांनी पराभव केल्याने श्रीनिवास यांनी अशा प्रकारचे वादग्रस्त विधान केले आहे. श्रीनिवास यांचा तो व्हिडिओ देखील मालवीय यांनी टि्वट करीत शेअर केला आहे.

काय म्हणाले होते श्रीनिवास...

युथ काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास यांनी सोमवारी ईरानी यांच्याबाबत हे विधान केलं होते. "जेव्हा सिलेंडरची किमंत ४०० रुपये होती, तेव्हा ही (स्मृती ईरानी) 'महागाईची डायन' विषयी बोलत होत्या. आता सिलेंडरची किमंत १ हजार १०० रुपयांपर्यंत पोहचली तेव्हा ही (स्मृती ईरानी) 'डायन' आता 'डार्लिंग' झाली आहे," "श्रीनिवास यांच्या प्रतिमा मलीन करण्यासाठी भाजपकडून अशा प्रकारच्या तक्रारी दाखल करण्यात येत आहेत, " असे श्रीनिवास यांच्या वकीलांची माध्यमांना सांगितले.

राहुल गांधी न्यायालयात जाणार

'मोदी' आडनावावर वादग्रस्त विधान केल्यामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना खासदारकी गमवावी लागली आहे. सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने ही कारवाई केली आहे. या कारवाईला आव्हान देणारी याचिका काँग्रेसकडून दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसच्या विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईच्या विरोधात येत्या दोन दिवसात काँग्रेस न्यायालयात धाव घेणार आहे. याबाबतची याचिका तयार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT