Lalit Modi On Rahul Gandhi: राहुल गांधींचा पाय आणखी खोलात ; मोदी न्यायालयात जाणार ; म्हणाले, "पप्पू..साबित करो मैं..'

Lalit Modi On Rahul Gandhi Over Bhagoda Comment: ब्रिटेनमध्ये गुन्हा दाखल करणार
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama

Modi Surname Controversy: 'मोदी' आडनाव हे काँग्रेसचे नेते, माजी खासदार राहुल गांधी यांच्या पाठलाग करीत असल्याचे दिसते, कारण भाजप आमदार पूर्णेश मोदी यांच्यानंतर आता ललित मोदी हे राहुल गांधींना न्यायालयात खेचणार आहेत. राहुल गांधी यांच्याविरोधात ते ब्रिटेनमध्ये गुन्हा दाखल करणार आहेत.

ललित मोदी यांनी आज (गुरुवार) सकाळी टि्वट करीत ही माहिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ललित मोदी यांनी टि्वट करीत राहुल गांधी, काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी भारतातील अनेक नेत्यांना टॅग करीत राहुल गांधी यांची परदेशात किती संपत्ती आहे, याचे पुरावे माझ्याकडे आहे, असल्याचे सांगितले आहे.

आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी राहुल गांधी यांचा सवाल करीत टि्वट केले आहे. ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, "राहुल गांधी यांनी कुठल्या आधारे मला फरार म्हटलं आहे. मला कधीच दोषी ठरविण्यात आलेले नाही," "विरोधीपक्षाकडे सध्या कुठलेच काम नाही, ते चुकीच्या माहितीच्या आधारे किंवा राजकीय सुडबुद्धीनं हे करीत आहेत," असे मोदी म्हणाले.

Rahul Gandhi
Ajit Pawar : मुद्दामहून दंगली घडवल्या जात आहेत का ? अजितदादांचा शिंदे-फडणवीसांना सवाल

"राहुल गांधी यांच्याविरोधात माझ्याकडे सर्व पुरावे,पत्ते आहेत. मी पुराव्यासह त्यांची सर्व मालमत्तांचे फोटो आणि पत्ते पाठवू शकतो. देशातील जनतेला मूर्ख बनवू नका, देशावर राज्य करण्याचा आपला हक्क आहे,असे गांधी परिवाराला वाटते," असे मोदींनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

Rahul Gandhi
Congress 3 MLA Suspended: काँग्रेसला दणका ; राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर आणखी दोन आमदार निलंबित ; काय आहे प्रकरण ?

'मोदी' आडनावावर वादग्रस्त विधान केल्यामुळे राहुल गांधी यांना खासदारकी गमवावी लागली आहे. सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने ही कारवाई केली आहे.

या कारवाईला आव्हान देणारी याचिका काँग्रेसकडून दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसच्या विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईच्या विरोधात येत्या दोन दिवसात काँग्रेस न्यायालयात धाव घेणार आहे. याबाबतची याचिका तयार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com