Nagaland Assembly Election Results
Nagaland Assembly Election Results Sarkarnama
देश

Sharad Pawar News : नागालँडमध्ये शरद पवारांची जादू; राष्ट्रवादी काँग्रेसला ७ जागांवर आघाडी

सरकारनामा ब्यूरो

Nagaland Assembly Election Results : देशातील तीन राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. मेघालय, नागालँडमधील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (२७ फेब्रुवारी) मतदान पार झाले होते. नागालँडमध्ये एनडीएचा सहकारी नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टी (एनडीपीपी) सत्ता राखताना दिसत आहे.

नागालँडमध्ये 36 जागांवर एनडीपीपी आणि भाजप (BJP) आघाडीवर आहे. त्रिपुरामध्ये 34 जागांवर भाजप युती आघाडीवर आहे. मेघालयात एनपीपी 25 जागांवर पुढे आहे. नागालॅंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसलाही (NCP) मोठे यश मिळले आहे. त्यांच्या 4 जागांवर विजय मिळला आहे. तर तीन जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत. एकून सात जागा राष्ट्रवादीला मिळण्याचा अंदाज आहे.

27 फेब्रुवारी रोजी नागालँडमधील 16 जिल्ह्यांतील 60 पैकी 59 विधानसभा जागांवर 85. 90% मतदान झाले होते. मागील निवडणुकीच्या तुलनेत 10% अधिक मतदान झाले होते. 2018 मध्ये नागालॅंडमध्ये 75% मतदान झाले होते. 10 फेब्रुवारी रोजी अकुलुटो विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार खेकाशे सुमी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे भाजपचे उमेदवार काजेतो किनीमी यांची बिनविरोध निवड झाली होती.

नागालँडमध्ये सध्या नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीची सत्ता आहे. या निवडणुकीत नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीची आणि भाजपची आघाडी आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. दरम्यान, आज इतिहास घडला असून स्वातंत्र्यानंतर तब्बल ६० वर्षांनंतर नागालॅंडच्या विधानसभेत महिला पोचली आहे. नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या (NDPP) हेकानी जाखलू नागालॅंडच्या पहिल्या आमदार ठरल्या आहेत.

ईशान्येकडील नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय या तीन राज्यांतील निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. या तीनही राज्यांतील जनतेचे डोळे निकालाकडे होते. पण, सर्वाधिक नजर नागालँडकडे होती. नागालँड राज्य १९६३ मध्ये अस्तित्वात आले. त्याला ६० वर्षे झाली. पण आजपर्यंत एकही महिला आमदार निवडून आलेली नव्हती. मात्र, हेकानी जाखलू यांनी इतिहास घडवत प्रथमच नागालॅंडच्या विधानसभेत महिला म्हणून पाऊल ठेवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT